मुंबई : घाटकोपर पश्चिम कातोडीपाडा येथील दहावीचा विद्यार्थी सायकलवरून जात असताना घसरून पडला असता उघड्यावर असणारी लोखंडी सळी डोळ्यात घुसून जखमी झालेल्या त्या विद्यार्थांचा सहा दिवसानंतर रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. विवेक आनंद घडशी ( 15 वर्षे ) असे विद्यार्थाचं नाव आहे. त्याच्यावर केइएम रूग्णालयात उपचार सुरू होते.


गुरुवारी (5 मार्च ) सांयकाळी 4 च्या सुमारास विवेक गुरुवारी सुट्टी असल्याने अभ्यासासाठी सायकलद्वारे मित्राच्या घरी जात असताना कातोडीपाडा येथे मनपाचे गटाराच्या ड्रेनेज लाईनचे बांधकाम सुरू होते. या दरम्यान गटाराच्या लोखंडी सळी उघड्यावर होत्या याच दरम्यान बांधकांमासाठी लागणारी खडी रस्त्यावर पडून असल्याने विवेकची सायकल घसरून विवेकाचा तोल जाऊन त्याच्या डाव्या डोळ्यात सळी घुसून तो जखमी झाला होता. त्याला उपचारासाठी केइएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेली सहा दिवस विवेक हा कोमात होता. डॉक्टरांकडून त्याला वाचवण्यासाठी खूप प्रयत्न झाला मात्र अखेर बुधवारी (11 मार्च) दुपारी 1 च्या सुमारास विवेकला डॉक्टरांनी मृत घोषित केले. यामध्ये कंत्राटदाराच्या विरोधात 338 गुन्हा दाखल करून कोर्टात हजर केले असता त्याची जामिनावर मुक्तता झाली आहे.

विशेष म्हणजे यावेळी विद्यार्थ्याच्या मदतीला कोणीही पुढे आलं नाही. बॅरिकेट्स लावले नसल्याने विद्यार्थ्याला खड्ड्याचा अंदाज आला नाही आणि त्याचा अपघात झाल्याचं प्रत्यक्षदर्शीने सांगितलं. अपघात झाला त्यावेळी या ठिकाणी कोणतेही बॅरिकेड्स नव्हते. अपघात झाल्यानंतर इथे बॅरिकेड्स लावण्यात आले आणि रस्त्यावर स्लॅब टाकण्यात आला आहे.

काम सुरु असताना सुरक्षेची काळजी घेणं, उपाययोजना करणं, बॅरिकेड्स लावणं हे महापालिकेचं प्राथमिक कर्तव्य आहे. परंतु महापालिकेने ही काळजी घेतली नाही, परिणामी याचा फटका दहावीच्या विद्यार्थ्याला बसला आहे.

SSC Student Accident | दहावीच्या परीक्षेला जाणारा विद्यार्थी खड्ड्यात पडून जखमी, सळ्या डोळ्यात गेल्याने गंभीर जखमी



संबंधित बातम्या :

मुंबईत दहावीचा विद्यार्थी खड्ड्यात पडला, डोळ्यात सळी घुसल्याने गंभीर जखमी