मुंबई : राज्यात 30 एप्रिल ते 15 मे दरम्यान राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होण्याचा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे. राज्यात रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली तरी राज्य सरकारची मोठ्या प्रमाणात तयारी झाली आहे, असंही राजेश टोपे यांनी सांगितलं.


राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यूदर कमी करण्यासाठी शासकीय पातळीवरही प्रयत्न केले जात असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली. येत्या 30 एप्रिल ते 15 मे दरम्यान स्पाईक येण्याची शक्यता आहे. पण त्यासाठी आरोग्य यंत्रणेची सगळी तयारी आहे. मात्र यासोबतच महाराष्ट्रातील जनतेने स्वयंशिस्त पाळली पाहिजे, असंही राजेश टोपे यांनी आवाहन केलं.


Corona Patients | राज्यात 30 एप्रिल ते 15 मे दरम्यान स्पाईक येण्याचा तज्ज्ञांचा अंदाज - राजेश टोपे


कोरोनाची लक्षणे दिसल्यास दुर्लक्ष करु नये, डॉक्टरांना दाखवा : राजेश टोपे


कोरोना उपचारासाठी असलेल्या रुग्णालयांमध्ये आता ऑक्सिजन स्टेशन उभारण्यात येणार आहे. यामध्ये प्रत्येक खाटेजवळ ऑक्सिजन मास्क आणि त्याला ऑक्सिजनचा पुरवठा करणारी व्यवस्था उभारण्यात येणार आहे. त्यामुळे रुग्णांना आवश्यकता वाटल्यास त्याचा वापर केला जाईल. मेडिकल ऑक्सिजनचा पुरवठा कमी होऊ नये, म्हणून त्याच्या उत्पादकांना सूचना देण्यात आल्या आहेत. मुंबईत काही ठिकाणी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून हायड्रॉक्सिक्लोरोक्विनच्या गोळ्या देण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.


चिंता वाढवणारी बातमी! राज्यात 466 नव्या रूग्णांची भर; कोरोना बाधितांचा आकडा 4666 वर


अमेरिका, इटली, फ्रान्स, ब्रिटन या देशांमधील कोरोनाच्या परिस्थितीवरुन आपण अंदाज लावू शकतो स्पाईक आला म्हणजे रुग्णांची संख्या किती झपाट्याने वाढते. यामुळे आरोग्य यंत्रणेवर ताण येतो. त्यामुळे राज्य सरकारने या तज्ज्ञांच्या अंदाजावर लक्ष केंद्रीत करुन तयारी केली आहे.


संबंधित बातम्या




CM on #Lockdown | लॉकडाऊन उठवलेला नाही, गर्दी झाल्यास पुन्हा निर्बंध घालावे लागतील - मुख्यमंत्री ठाकरे