मुंबई : मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्स इथे भरधाव मर्सिडीज कारनं एका पादचाऱ्याला चिरडलं आहे. यामध्ये पादचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला. राजेंद्र कुमार असं मृत व्यक्तीचं नाव असून तो सुतार काम करायचा. हिरा व्यापारी ललित अदानी यांचा मुलगा चैतन्य कार चालवत होता.


प्रत्यक्षदर्शिनी दिलेल्या माहितीनुसार, राजेंद्र कुमार हे भाजी घेण्यासाठी जात होते. हाजीअली रोडवरील सिग्नल सुटला त्यावेळी वोल्वो कार आणि मर्सिडीज कार एकमेकांना ओव्हवरटेक करत महालक्ष्मी स्टेशनच्या दिशेने जात होत्या.





अचानक मर्सिडीज कारचा चालक चैतन्य अदानी याचा गाडीवरचा ताबा सुटला आणि त्याच्या गाडीने राजेंद्रला चिरडलं. गाडी चैतन्यची गाडी महालक्ष्मी रेसकोर्सची संरक्षण भिंत तोडत रेसकोर्सच्या आवारात शिरली.


याप्रकरण ताडदेव पोलिसांनी आरोपी चैतन्यला अटक करुन गुन्हा दाखल केला आहे. त्याला मंगळवारी कोर्टात हजर करण्यात येणार आहे. तर वोल्वो गाडी बिग बाजारचे मालक किशोर बियाणी यांचा मोठा भाऊ विजय बियाणीची होती. ही गाडी त्यांचा चालक चालवत होता.