मुंबई : रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी! 17 मे ते 2 जूनदरम्यान विशेष रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने हा निर्णय घेतला आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे 24 डब्यांच्या गाड्यांसाठी प्लॅटफॉर्म 10 आणि 11 च्या विस्तारासाठी आणि तांत्रिक कामांसाठी विशेष ब्लॉक चालवण्यात येणार आहे. हा रात्रकालीन विशेष ब्लॉक 17 मे ते 2 जून 2024 पर्यंत मध्यरात्री ब्लॉक घेण्यात येणार आहे. 


17 मे ते 2 जूनपर्यंत विशेष रात्रकालीन ब्लॉक



  • 17-18 मेच्या मध्यरात्रीपासून ते 2 जूनपर्यंत रात्री 23.00 वाजता ते पहाटे 05.00 वाजेपर्यंत दररोज 6 तासाचे विशेष ब्लॉक्स घेण्यात येतील. 

  • भायखळा वगळता भायखळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान अप धीमी लाईन, अप आणि डाउन जलद लाईन मार्गावर 17 ते 19 मे च्या मध्यरात्रीपर्यंत ब्लॉक घेण्यात येतील. 


उपनगरीय गाड्यांवर परिणाम



  • ब्लॉक कालावधीत भायखळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान उपनगरीय रेल्वे सेवा उपलब्ध नसेल.

  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून डाऊन धीमी लाईनवर ब्लॉक होण्यापूर्वीची शेवटची लोकल कसारा एन 1 असेल जी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विभागासाठी 00:14 वाजता सुटेल आणि कसारा येथे 03:00 वाजता पोहोचेल.

  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वरून डाऊन स्लो लाईनवर ब्लॉक नंतर पहिली लोकल कर्जत एस 3 असेल जी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून 04:47 वाजता सुटेल आणि कर्जत येथे 06:07 वाजता पोहोचेल.

  • अप धीमी लाईनवर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस साठी ब्लॉक होण्यापूर्वीची शेवटची लोकल कर्जत येथून एस 52 असेल जी कल्याण येथून 22:34 वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे 00:06 वाजता पोहोचेल.

  • अप धीमी लाईनवर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस साठी ब्लॉकनंतर पहिली लोकल ठाणे येथून टी 2 असेल जी ठाणे येथून 04:00 वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून 04:56 वाजता पोहोचेल.


मेल, एक्सप्रेस ट्रेन्सवर परिणाम



  • 17 मे ते 18-19 मे मध्यरात्री या कालावधीत दादर स्थानकावरील या गाड्या रद्द

  • 12533 लखनौ-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पुष्पक एक्स्प्रेस 16, 17, 18 मे रोजी रद्द

  • 11058 अमृतसर-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्स्प्रेस 16, 17, 18 मे रोजी रद्द

  • 11020 भुवनेश्वर-मुंबई कोणार्क एक्स्प्रेस 16, 17, 18 मे रोजी रद्द

  • 12810 हावडा-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मेल 16, 17, 18 मे रोजी रद्द

  • 12052 मडगाव-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जनशताब्दी एक्स्प्रेस 17, 18, 19 मे रोजी रद्द

  • 22120 मडगाव-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस तेजस एक्स्प्रेस एक्स्प्रेस 17, 18, 19 मे रोजी रद्द

  • 12134 मंगलोर जंक्शन-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्स्प्रेस एक्स्प्रेस 17, 18, 19 मे रोजी रद्द

  • 12702 हैदराबाद-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हुसेन सागर एक्स्प्रेस 17, 18, 19 मे रोजी रद्द

  • 11140 होसापेट जंक्शन-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्स्प्रेस 17, 18, 19 मे रोजी रद्द

  • 22224 साईनगर शिर्डी-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वंदे भारत एक्स्प्रेस 17, 18, 19 मे रोजी रद्द

  • 12870 हावडा-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सुपरफास्ट एक्स्प्रेस  17, 18, 19 मे रोजी रद्द


या एक्प्रेसला पनवेलपर्यंतच थांबा



  • 17 मे ते 19 मे पर्यंत 10104 मडगाव-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मांडोवी एक्स्प्रेस पनवेल स्थानकापर्यंतच चालवली जाईल.


17 ते 19 मे दरम्यान दादर स्थानकावरुन या गाड्या रद्द



  • 22157 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-चेन्नई सुपरफास्ट मेल 17, 18, 19 मे रोजी रद्द

  • 11057 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-अमृतसर एक्स्प्रेस 17, 18, 19 मे रोजी रद्द

  • 22177 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-वाराणसी महानगरी एक्स्प्रेस 18, 19, 20 मे रोजी रद्द

  • 12051 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेस 18, 19, 20 मे रोजी रद्द

  • 22229 CSMT-मडगाव वंदे भारत एक्स्प्रेस 18, 19, 20 मे रोजी रद्द


CSMT स्थानकावरून निघणाऱ्या ट्रेन पनवेल स्थानकावरून सुटतील


20111 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-मडगाव कोकण कन्या एक्स्प्रेस 17, 18, 19 मे रोजी पनवेल स्थानकावरून सुटेल.