सचिन वाझेंनंतर आणखी काही अधिकाऱ्यांची चौकशी होण्याची शक्यता, NIA सूत्रांची माहिती

दीपेश त्रिपाठी, एबीपी माझा Updated at: 14 Mar 2021 09:16 AM (IST)

इनोव्हा गाडीतून जाणाऱ्या तिघांना अटक होण्याची शक्यता आहे. त्यासाठी एनआयएची तीन पथकं रवाना झाल्याची माहिती आहे. यामध्ये दोन्ही चालक आणि एका व्यावसायिकाचा समावेश आहे. 

Sachin_VAze

NEXT PREV

मुंबई : मुकेश अंबानींच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटक प्रकरणाचा तपास करणाऱ्या एनआयएने सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझेंना अटक केली आहे. या प्रकरणात एकूण 5-7 जणांचा समावेश असल्याची माहिती आहे. या प्रकरणात आणखी तीन अधिकारी, कर्मचारी यांचा समावेश असण्याची शक्यता आहे. सचिन वाझे यांच्या शिवाय आणखी काही पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची चौकशी होऊ शकते. त्यामुळे पोलीस वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.  


एनआयएने रात्री उशीरा पांढऱ्या रंगाची इनोव्हा कार टो करून आणली आहे. एक इनोव्हा कार 25 फेब्रुवारीला म्हणजे त्याच दिवशी मुलुंड टोल नाक्यावर सीसीटीव्हीमध्ये दिसली होती. एनआयए कार्यालयात रात्री आणण्यात आलेली इनोव्हा कार  तिच आहे का हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. याच इनोव्हा गाडीतून जाणाऱ्या तिघांना अटक होण्याची शक्यता आहे. त्यासाठी एनआयएची तीन पथकं रवाना झाल्याची माहिती आहे. यामध्ये दोन्ही चालक आणि एका व्यावसायिकाचा समावेश आहे. 


Sachin Vaze Arrested : अखेर सचिन वाझेंना अटक, आतापर्यंत नेमकं काय घडलं, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण? 


सचिन वाझेंवर कोणती कलमान्वये कारवाई?


NIA ने सचिन वाझे यांच्यावर आयपीसी कलम 286, 465, 473, 506(2), 120 B आणि स्फोटक पदार्थ कायदा 1908 कलम 4 अ, ब अंतर्गत कारवाई केली आहे. यामध्ये कलम 286- जाणीवपूर्वक किंवा अजाणतेपणाने स्फोटकं बाळगणे, इतरांच्या जीवाला धोका होईल असं वर्तन करणे, कलम 465 – खोट्या किंवा बनावट गोष्टी करणे, कलम 473 – दिशाभूल करण्यासाठी केल्या जाणाऱ्या बनावट कृती, कलम 506(2) – दहशत निर्माण करणं किंवा धमकी देणे, कलम 120 B – गुन्हेगारी स्वरुपाच्या षडयंत्रात सहभाग घेणे, स्फोटक पदार्थ कायदा 1908 कलम 4 अ, ब – स्फोटकं बाळगणे याचा समावेश आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :










 


Published at: 14 Mar 2021 09:08 AM (IST)

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.