मुंबई : बँकेतील आर्थिक व्यवहाराची कामे 20 तारखेच्या आतच करुन घेणे गरजेचे आहे. कारण यानंतर 5 दिवस बँका बंद राहणार आहेत. 21 ते 26 डिसेंबरदरम्यान 5 दिवस बँका बंद राहणार आहेत. ऑल इंडिया ऑफिसर कन्फडरेशनने 21 डिसेंबरला बँक कर्मचाऱ्यांबाबत केंद्रांच्या नीती विरोधात संपाचा निर्णय घेतला आहे.
22 डिसेंबरला महिन्याचा चौथा शनिवार आणि 23 डिसेंबरला रविवार असल्याने बँकेला सुट्टी असेल. त्यानंतर सोमवारी 24 डिसेंबरला बँका उघडतील. पण यावेळी तुम्हाला गर्दीचा सामना करावा लागेल. 25 डिसेंबरला ख्रिसमन निमित्त बँकांना सुट्टी असणार आहे. त्यानंतर 26 डिसेंबरला यूनाइटेड फोरमने पुन्हा संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे.
वेतनवाढ आणि बँक ऑफ बडोदा, देना बँक व विजया बँक यांच्या विलयाच्या निर्णयाला विरोध यासाठी बँकांकडून संपाचे हत्यार उपसण्यात आले आहे. बँका बंद असल्याने एटीएममध्ये देखील गर्दीचा सामना करावा लागू शकतो. बँकांना सुट्टी असली तरी एटीएमध्ये पैसे टाकण्याचं काम सुरु असणार आहे.
केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात हा संप पुकारला जात असून, बँक ऑफ बडोदा, देना बँक व विजया बँक यांच्या विलीनीकरणाच्या मुद्द्यावरून सरकारला धारेवर धरण्यात येणार आहे. तसेच कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीचा मुद्दाही या संपाच्या केंद्रस्थानी असणार आहे.
असा असेल बँकांचा संप आणि सुट्ट्यांचा कार्यक्रम
21 डिसेंबर - बँक कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यासाठी ऑल इंडिया बँक ऑफिसर कन्फडरेशनचा (AIBOC) संप
22 डिसेंबर – महिन्यातील शेवटचा शनिवार असल्याने बॅंकाना सुट्टी
23 डिसेंबर - रविवार असल्याने बँकांना सुट्टी
24 डिसेंबर – सोमवारी बॅंका सुरु राहतील.
25 डिसेंबर – ख्रिसमस असल्याने बॅंका बंद राहतील.
26 डिसेंबर - युनायटेड फोरमचा पुन्हा एकदा संपावर जाण्याचा निर्णय. यावेळी कर्मचारी आणि अधिकारी सर्वच संपावर.
पाच दिवस बँका बंद, आर्थिक व्यवहार अडचणीत येणार!
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
20 Dec 2018 07:42 PM (IST)
वेतनवाढ आणि बँक ऑफ बडोदा, देना बँक व विजया बँक यांच्या विलयाच्या निर्णयाला विरोध यासाठी बँकांकडून संपाचे हत्यार उपसण्यात आले आहे. बँका बंद असल्याने एटीएममध्ये देखील गर्दीचा सामना करावा लागू शकतो. बँकांना सुट्टी असली तरी एटीएमध्ये पैसे टाकण्याचं काम सुरु असणार आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -