मुंबई: पीएमसी घोटाळ्यातील मास्टरमाईंड राकेश वाधवान हा किरीट सोमय्या यांचा पार्टनर आहे. त्या राकेश वाधवान यांना भाजपला 20 कोटी रुपयांचा निधी दिला होता असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. पीएमसी बँक घोटाळ्याच्या आधी सोमय्यांच्या जवळच्या अनेक लोकांनी त्यातून पैसे काढून घेतले आहेत. त्यामुळे किरीट सोमय्या आणि त्यांच्या मुलगा निल सोमय्या यांना अटक करा असं खासदार संजय राऊत म्हणाले. 


खासदार संजय राऊत म्हणाले की, "पीएमसी बँकेच्या घोटाळ्याप्रकरणी राकेश वाधवान याला ब्लॅकमेल केलं आणि त्याच्याकडून कोट्यवधीची जमीन घेतली. त्यांनी एक जमीन सात कोटी रुपयांना आणि वसई येथील 400 कोटी रुपयांची जमीन चार कोटी रुपयाला घेतली आहे आणि त्या जमीनीवर जी कंपनी आहे त्या कंपनीचा डायरेक्टर नील किरीट सोमय्या आहे. निकॉन फेज वन आणि निकॉन फेज दोन हा हजारो कोटींची प्रकल्प उभारला आहे. त्याला पर्यावरण क्लिअरन्स नाही. या प्रकरणी कंपनीच्या सर्व परवानग्या रद्द करा."


पीएमसी बँकेच्या घोटाळ्यातून मिळालेल्या पैशातून अनेक ठिकाणी जमिनी घेतल्या आहेत. या बँकेच्या घोटाळ्याप्रकरणी किरीट सोमय्या आणि निल सोमय्या यांना अटक करा अशी मागणी खासदार संजय राऊत यांनी केली आहे. 


किरीट सोमय्या दलाल असल्याचा आरोप
खासदार संजय राऊत भाजप नेते किरीट सोमय्याविषयी बोलताना म्हणाले की, "छत्रपतींच्या या राज्यामध्ये या आधी असं घाणेरडे राजकारण केलं नाही. उद्धव ठाकरे आणि परिवाराच्या रोज काही ना काही बातम्या उठवायच्या. पण या बातम्या जो सांगतो ना तो दलाल आहे. किरीट सोमय्या हा माणूस मराठी द्वेष्टा आहे. त्यानेच मुंबईतील शाळांमध्ये मराठी सक्ती केल्यानंतर कोर्टाचे दरवाजे ठोठावले होते. आधी त्याचं थोबाड बंद करा. मराठीचा द्वेष करणाऱ्या या माणसाकडून अजून काय अपेक्षा करणार?


संबंधित बातम्या: