मुंबई : 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय खलबतं सुरु झाली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या काल झालेल्या बैठकीनंतर शिवसेनेचीही आज शिवसेना भवनमध्ये बैठक होत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ही बैठक बोलावली आहे.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतले खासदार, आमदार, नगरसेवक, विभाग प्रमुख, उप विभाग प्रमुख, महिला आघाडी, कामगार संघटना यांची या बैठकीला उपस्थिती आहे.
बैठकीला खासदार अरविंद सावंत, मनोहर जोशी, गजानन कीर्तीकर, आशिष चेंबूरकर, सदा सरवणकर तसेच विभाग प्रमुख हजर हजर आहेत.
राजकीय पक्ष लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. पुढच्या वर्षी फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणूक होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. शरद पवार यांनी बैठकीत ही माहिती दिल्याचं बोललं जात आहे.
संबंधित बातम्या :
ज्या पक्षाचे खासदार जास्त त्यांचा पंतप्रधान- शरद पवार
नालासोपारा प्रकरणी नाही, आगामी निवडणुकांच्या चर्चेसाठी राष्ट्रवादीची बैठक
आगामी निवडणुकांत राष्ट्रवादीचा काँग्रेसला समान जागांचा प्रस्ताव- सूत्र
2019 च्या लोकसभा निवडणुकीची खलबतं, शिवसेनेचीही बैठक
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
28 Aug 2018 01:34 PM (IST)
राष्ट्रवादी काँग्रेसच्या काल झालेल्या बैठकीनंतर शिवसेनेचीही आज शिवसेना भवनमध्ये बैठक होत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ही बैठक बोलावली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -