मुंबई : शिवसेनेचे आमदार आणि माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या विरोधात शिवसैनिकांमध्ये नाराजी वाढली आहे. तानाजी सावंतांनी घेतलेल्या शिवसेना विरोधी भूमिकेमुळे शिवसैनिकांचा तानाजी सावंतांवर रोष आहे. दरम्यान आज दुपारी सोलापूर आणि उस्मानाबाद येथील कार्यकर्त्यांची मातोश्रीवर आढावा बैठक बोलावली आहे. मात्र या बैठीकाला तानाजी सावंतांच्या अनुपस्थितीमुळे शिवसैनिकांमधील नाराजी आणखी वाढली असून त्यांची पक्षातून हकालपट्टी करावी, अशी केली जात आहे.

Continues below advertisement

मंत्रिमंडळ विस्तारानंतर तानाजी सावंत नाराज झाले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबतही त्यांचे खटके उडाल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. त्यानंतर जिल्हा परिषद निवडणुकीतही तानाजी सावंत यांनी बंड करत भाजपसोबत हातमिळवणी केली होती. याचा फटका याठिकाणी निवडणुकीत शिवसेनेला बसला. तसेच उद्धव ठाकरे यांच्या मराठवाडा दौऱ्यातही त्यांनी दांडी मारली होती. एकूणच तानाजी सावंतांनी शिवसेनाविरोधी भूमिका घेतल्याने शिवसैनिक नाराज आहेत. आता तानाजी सावंताची पक्षातून हकालपट्टी करा अशी मागणी शिवसैनिक करत आहेत. दुपारच्या बैठकीनंतर उद्धव ठाकरे काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष आहे.

तानाजी सावंत यांच्या मंत्रिपदाची मागणी सोलापुरातील पदाधिकाऱ्याला महागात

Continues below advertisement

सोलापूर शिवसेना जिल्हा सहसंपर्क प्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील यांची पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयातून त्याबद्दल माहिती देण्यात आली आहे. लक्ष्मीकांत ठोगें पाटील यांनी पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांना मंत्रिपद न दिल्याने सोलापुरात लक्ष्मीकांत ठोंगे पाटील यांनी शिवसैनिकांची बैठक घेत पक्षावर दबाव आणण्याचा प्रयत्न केल्याचं म्हटलं जात आहे. सोबतच उस्मानाबाद जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये तानाजी सावंत गटाने भाजपला साथ दिली. सावंतांची ही भूमिका पक्षाला चांगलीच जिव्हारी लागल्याचं दिसतंय. दरम्यान सोलापूर जिल्हाच्या प्रभारी जिल्हाप्रमुखपदी पुरुषोत्तम बरडे यांची निवड करण्यात आली आहे.

तानाजी सावंतांविरोधात पोस्टरबाजी

सोलापुरात काही दिवसांपूर्वी तानाजी सावंत यांच्या विरोधात बॅनरबाजी करण्यात आली होती. माजी मंत्री आमदार तानाजी सावंत यांचा खेकडा असा उल्लेख करत टीका करण्यात आली. 'उद्धव साहेब हा खेकडा सोलापूर धाराशिवची (उस्मानाबाद) शिवसेना पोखरत आहे, वेळीच नांग्या मोडा' असं म्हणत निशाणा साधण्यात आला होता. मात्र हे पोस्टरबाजी कुणी केली हे अद्याप स्पष्ट झालं नाही.

संबंधित बातम्या