Maharashtra National Law University : नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीमधील (national law university) रिसर्च असिस्टंट या पदाच्या भरतीसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. संशोधन सहाय्यक – उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग (DPIIT) IPR चेअर, MNLU मुंबई, असं या पदाचं नाव आहे. या पदासाठी इच्छुक उमेदवारांनी त्यांचे अर्ज पाठवावेत. 15 फेब्रुवारीपर्यंत तुम्ही अर्ज पाठवू शकता.
आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव :
1. भारतीय विद्यापीठातून किमान 55% गुणांसह कायदा किंवा विज्ञान विषयातील पदव्युत्तर पदवी किंवा एखाद्या मान्यताप्राप्त परदेशी विद्यापीठातून समतुल्य पदवी (equivalent degree).
2. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संशोधन ट्रेंड आणि संबंधित क्षेत्रातील घडामोडींचे चांगले ज्ञान असणे आवश्याक
3. अध्यापन/संशोधनाव्यतिरिक्त आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण कार्यशाळा आणि विचारमंथन ऑनलाइन/साइटवर चर्चा करण्याची संकल्पना आणि आयोजन करण्याची क्षमता असणे आवश्क आहे.
4. इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असणे आवश्यक आहे.
असा करा अर्ज
इच्छुक उमेदवार 15 फेब्रुवारीपर्यंत अर्ज भरू शकतात. recruitment@mnlumumbai.edu.in या मेल आयडीवर आपला CV इच्छुक उमेदवाराने पाठवावा.
मुलाखतीची तारीख
निवड झालेल्या उमेदवारांची मुलाखत 21 फेब्रुवारी रोजी घेण्यात येणार आहे.
मानधन
निवडलेल्या झालेल्या उमेदवाराला 40 हजार मानधन देण्यात येईल.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- Bank Job 2022 : सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये SO पदांसाठी मेगा भरती; पदवीधर अर्ज करू शकतात
- Jobs: सरकारी बँकेत पदवीधरांना नोकरीची संधी, 'असा' करता येईल अर्ज
- Jobs : बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये अधिकारीपदासाठी बंपर भरती, जाणून घ्या सर्व माहिती
- IOCL Recruitment 2022 : इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये बंपर भरती; 15 फेब्रुवारी अर्ज करण्याची अंतिम तारिख, त्वरा करा!
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha