मुंबई : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील टी-20 सामने अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवले जात आहेत. हे सामने पाहण्यासाठी देशभरातून लोक अहमदाबाद येथे जमत आहे.  या पार्श्वभूमीवर मुंबई किंवा राज्याच्या इतर भागातून जे नागरिक हे सामने पाहून राज्यात परतत असतील त्यांची कोविड टेस्ट करण्यात यावी अशी मागणी शिवसेना आमदार सदा सरवणकर यांनी केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सरवणकर यांनी यासंबंधी पत्र लिहिले आहे. 


सदा सरवणकर यांनी पत्रात म्हटलं की, "राज्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यात भारत व इंग्लंड क्रिकेटचे सामने चालू असून मुंबईतून अनेक लोक ते सामने पाहण्यासाठी गेलेले आहेत. स्टेडियममध्ये कोरोना संबंधी घालण्यात आलेल्या नियमांचे पालन करत नसल्याचे दूरचित्रवाहिनीमधून दिसून येते. या पार्श्वभूमीवर शिवसेना आमदार सदा सरवणकर यांनी क्रिकेटचे सामने पाहून महाराष्ट्र व मुंबईत रेल्वे मार्गे, हवाई मार्गे किंवा रोड मार्गे परतीचा प्रवास करणार्‍या नागरिकांना RT-PCR Test (कोविड टेस्ट) तसेच काही दिवसांकरता क्वारंटाईन / होम क्वारंटाईन करण्याची सक्ती करावी. जेणेकरुन कोरोनाचा संभाव्य प्रादुर्भाव थोड्या प्रमाणात रोखता येईल, अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली आहे."


राज्यात काल 16620 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद


राज्यात काल (15 मार्च) 16 हजार 620 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. तर काल नवीन 8 हजार 861 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. आज राज्यात 50 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. तसेच आतापर्यंत एकूण 21 लाख 34 हजार 072 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात एकूण 126231 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 92.21% वर पोहोचलं आहे. 


संबंधित बातम्या