मुंबई : सचिन वाझे प्रकरणात महत्वाचे अपडेट हाती आले आहे. वारंवार गाडीची नंबरप्लेट बदलल्याचं सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून समोर आलं आहे. एनआयएच्या सूत्रांच्या माहितीनुसार यातूनच सचिन वाझेंच्या अटकेमागचं महत्वाचं कारण समोर आलं आहे. एनआयएला सीसीटीव्ही फुटेजमधून काही माहिती मिळाली आहे, त्या माहितीच्या आधारे सचिन वाझे संशयाच्या घेऱ्यात सापडले आणि नंतर त्यांना अटक करण्यात आली. एबीपी न्यूजच्या हाती लागलेल्या Exclusive सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट दिसत आहे की, संशयाच्या घेऱ्यात असलेल्या नंबर प्लेटवाली इनोव्हा कार दोन वेळा मुंबई पोलिस कमिशनर ऑफिसमधून निघाली.  


यातील पहिलं फुटेज 24 फेब्रुवारीचं आहे. ज्यावेळी ही इनोव्हा गाडी सकाळी 11 वाजून 46 मिनिटांनी मुंबई पोलिस कमिशनर ऑफिसमधून निघाली. त्यावेळी गाडीचा नंबर MH10AZ** असा होता. तर दुसरं फुटेज 13 मार्चचं आहे ज्यावेळी तीच इनोव्हा दुपारी 3 वाजून 15 मिनिटांनी कमिशनर ऑफिसातून निघाली होती. त्यावेळीही गाडीचा नंबर MH10AZ** असाच होता.


एनआयएला संशय आहे की 24 फेब्रुवारीला ही इनोव्हा कमिशनर ऑफिसमधून निघाल्यानंतर ठाण्याला गेली. जिथं तिची नंबर प्लेट बदलण्यात आली.  


हे ही वाचा- Sachin Waze arrest | सचिन वाझे यांची अटक पूर्णपणे बेकायदेशीर, वाझे यांच्या वकिलाचा दावा


असा होता त्या दिवशीचा घटनाक्रम 


ठाण्यावरुन ती इनोव्हा कार 25 फेब्रुवारीला 1 वाजून 20 मिनिटांनी मुलुंड टोल नाका पार करुन मुंबईत आली. ( त्यावेळी गाडीचा नंबर MH04AN** असा होता)


त्यानंतर प्रियदर्शनी जवळ आधीपासून उभी स्कॉर्पिओ गाडी रात्री 1 वाजून 40 मिनिटांनी दिसली.


नंतर दोन्ही गाड्या एकामागोमाग एक रात्री 2 वाजून 18 मिनिटांनी मुकेश अंबानींच्या घराजवळ आल्या. जिथं 20 जिलेटीनसह स्कॉर्पिओ उभी केली गेली.


नंतर दोन्ही ड्रायव्ह इनोव्हामध्ये बसून तिथून फरार झाले.  


त्यानंतर रात्री 3 वाजून 05 मिनिटांनी इनोव्हा मुलुंड टोल नाका पार करते. (त्यावेळी या गाडीचा नंबर MH04AN** असा होता)


त्यानंतर इनोव्हा गाडी नंबर प्लेट बदलून परत अॅंटीलियाजवळ आली. आपली ओळख लपवण्यासाठी यावेळी पीपीई किट घातलेलं होतं. 


ही इनोव्हा पु्न्हा जवळपास 4 वाजून 3 मिनिटांनी मुलुंड टोकनाक्यावरुन मुंबईत आली. ( त्यावेळी गाडीचा नंबर MH10AZ** होता)


त्यानंतर 4 वाजून35 मिनिटांनी इनोव्हा गाडीचा ड्रायव्हर जिथं स्कार्पिओ उभी केली होती त्या जागी पोहोचला. 


या संशयिताने स्कॉर्पिओ गाडीची चौकशी केली आणि सकाळी  5 वाजून 18 मिनिटांनी मुलुंड टोलनाक्यावरुन ठाण्याच्या दिशेने गेला.  



Sachin Vaze | अंबानींच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटक प्रकरणात सचिन वाझेंना 25 मार्चपर्यंत NIA कोठडी



इतक्या नंबर प्लेट बदलवून कशी पटली इनोव्हाची ओळख


एनआयए सूत्रांच्या माहितीनुसार ज्यावेळी इनोव्हा गाडी (जिचा नंबर MH04AN** होता) मुंबईत पहिल्यांदा आली. त्यावेळी एका फुटेजमध्ये त्या गाडीच्या मागे नंबर प्लेटच्या खाली एक  प्लास्टिक स्टिकर दिसलं जे डेंट मार्क लपवण्यासाठी लावलं होतं. आणि ज्यावेळी इनोव्हा ( जिचा नंबर MH10AZ** होता) दुसऱ्यांदा मुंबईत आली, त्यावेळीही त्या गाडीच्या मागे नंबर प्लेटच्या खाली एक प्लास्टिकचं स्टिकर दिसून आलं. 


 (नोट- आम्ही गाडीचा नंबर यासाठी दिलेला नाही, कारण तो कुणाच्या तरी बाईकचा नंबर आहे)


Sachin Vaze Case : 'ती' इनोव्हा गाडी  क्राईम इंटेलिजेन्स यूनिटची, सचिन वाझे आणि टीमकडून गाडीचा वापर