Sanjay Raut vs Shinde Group : शिवसेना (Shiv Sena) ठाकरे गटाचे (Thackeray Group) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या अंतर्वस्त्र बाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर (Maharashtra Politics) आता पडसाद उमटू लागले आहेत. आज मुलुंडमध्ये संजय राऊत यांच्या विरोधात शिवसेना शिंदे गटाने अनोखी निदर्शने केली. संजय राऊत यांचा राष्ट्रवादीची अंतर्वस्त्र घातलेले बॅनल झळकावण्यात आले. संजय राऊत यांच्या अंतर्वस्त्रावर राष्ट्रवादीच्या घड्याळाचे लोगो दाखवण्यात आले आहेत. आज संजय राऊत यांच्या वाढदिवसाच्या दिवशीच शिवसेना शिंदे गटाने तीव्र निदर्शने करून संजय राऊत यांना उत्तर दिलं आहे. इतकंच नाही नत राऊतांच्या पोस्टरला जोडे मारुन घोषणाबाजी करत निषेध करण्यात आला. त्याचं पोस्ट फाडून आणि जोरदार घोषणा देऊन निषेध नोंदविण्यात आला आहे. राऊतांच्या घरावर मोर्चा नेण्याचा इशाराही शिंदे गटाने दिला आहे.
राऊतांविरोधात शिंदे गट रस्त्यावर
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) कुणाची अंडरवेअर घालतात हे तपासायला हवं, असं म्हणत खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर भर पत्रकार परिषदेत टीकास्त्र डागलं होतं. यानंतर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी पाहायला मिळत आहेत. हा वाद आता आणखी चिघळल्याचं पाहायला मिळत आहे. राऊतांच्या वक्तव्यावरून भाजपचे आमदार नितेश राणे यांनी निशाणा साधला होता. आता राऊतांविरोधात शिंदे गट रस्त्यावर उतरून निदर्शनं करताना पाहायला मिळत आहे.
नितेश राणेंचा राऊतांवर निशाणा
राऊतांच्या वक्तव्यानंतर भाजप आमदार नितेश राणे यांनी त्यांच्यावर टीका केली होती. यावेळी नितेश राणे म्हणाले की, "राज्याच्या मुख्यमंत्र्यांबद्दल अशी अश्लील भाषा करताना तुम्हाला लाज वाटली नाही. तुमच्या अंडरवेअरवर नेमका कुणाचा बिल्ला लागला आहे. मशाल चिन्ह आहे, घड्याळ आहे की हाताचा पंजा आहे? फोडा आणि राज्य करा ही भाजपची नीती आहे म्हणे, संजय राजाराम राऊत यांना थोडी आठवण करून देईन, राज साहेबांनी जेव्हा शिवसेना सोडली, तेव्हा त्यांच्या कार्यकर्त्यांनी तुमची गाडी का फोडली? ठाकरे घरण्यात ज्या काही काड्या आणि भांडण लावत होतात. आता तुमच्या मालकाच्या घरात तेजस आणि आदित्य ठाकरेंमध्ये भांडण कोण लावतंय? कोण काड्या घालतंय?" असं म्हणत नितेश राणे यांनी राऊतांवर गंभीर आरोप केले आहेत.
संजय राऊत काय म्हणाले?
"शिंदे आत्ताच भाजपमध्ये गेले आहेत. तुम्ही जर त्यांची अंतर्वस्त्र पाहिलीत, तर त्यावर कमळंच आहे. त्याशिवाय ते मुख्यमंत्रीपदी राहूच शकत नाही. आताच ते गुलाम झाले आहेत आणि गुलामांना स्वतःचं मत आणि स्वाभिमान नसतो. दोघांनी भांडणं करावी आणि आम्ही आमचं काम साध्य करुन घ्यावं, हीच भाजपची निती आहे. तोडा आणि राज्य करा हेच भाजपचं ध्येय. सत्ता, पैसा, आपल्या उद्योगपतींना धनवान बनणं. गरीबांना गरीब बनवणं हीच त्यांची निती.", असं वक्तव्य संजय राऊतांनी पत्रकार परिषदेत केलं होतं.