Sameer Wankhede : एनसीबीचे मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे सध्या अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक आणि एकूणच महाविकास आघाडीच्या रडारवर आहेत. मात्र श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान समीर वानखेडेंच्या (Sameer Wankhede) समर्थनार्थ मैदानात उतरली आहे. आज एनसीबीच्या मुंबई कार्यालयाबाहेर समीर वानखेडेंचा सत्कार करण्यात आला. तसेच त्यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली होती. 


समीर वानखेडेंवर एकापाठोपाठ एक आरोप होत असताना त्यांच्या समर्थनार्थही आता आंदोलनं होऊ लागली आहेत. बुधवारी सकाळी श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान या संघटनेतर्फे  समीर वानखेडेंच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसेच, नेमक्या त्याचवेळी कार्यालयात दाखल होणाऱ्या समीर वानखेडेंवर पुष्पवृष्टी करत त्यांना छत्रपती शिवरयांची एक प्रतिमा भेट देण्यात आली. समीर वानखेडेंनी या सर्व गोष्टींचा स्विकार केला, मात्र कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. त्यानंतर या संघटनेचे अध्यक्ष नितीन चौगुले यांनी एबीपी माझाला प्रतिक्रिया दिली. 


श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान संघटनेचे अध्यक्ष नितीन चौगुले एबीपी माझाशी बोलताना म्हणाले की, "नवाब मलिक हे केवळ एका कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याची बदनामी करत आहेत. ड्रग्जच्या व्यवसायाला पाठीशी घालणाऱ्या मलिकांना मंत्रीपदावर राहण्याचा कोणताही अधिकार नाही. नवाब मलिकांविरोधात श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान ही संघटना यापुढेही अशीच आंदोलनं करत राहील."


पाहा व्हिडीओ : शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचा समीर वानखेडेंना पाठिंबा



शर्ट 70 हजारांचा तर बूट 2 लाखांचे; समीर वानखेडेंच्या लाईफस्टाईलवर नवाब मलिकांचा निशाणा


मुंबई क्रूझ ड्रग (Mumbai Cruise Drug Case) प्रकरणाला नवं वळण लागलं असून यामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघालं आहे. सध्या राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसतात. नवाब मलिक (Nawab Malik) यांच्याकडून दररोज पत्रकार परिषदा घेऊन या प्रकरणात नवनवे खुलासे केले जातात. आजही नवाब मलिकांनी पत्रकार परिषदेत बोलताना समीन वानखेडेंवर टीकास्त्र डागलं. यावेळी नवा बॉम्ब फोडताना नवाब मलिक म्हणाले की, समीर वानखेडे (Sameer Wankhede) सत्तर हजारांचं शर्ट वापरतात, एक लाख रुपयांची पँट वापरतात आणि दोन लाख रुपयांचे शूज वापरतात, असा आरोप नवाब मलिकांनी केला आहे. 


नवाब मलिकांनी बोलताना म्हटलं की, "समीर वानखेडेंचे सर्व फोटो तुम्ही पाहा. त्यांचे बूट पाहा. louis vuitton चे बूट दोन-दोन, तीन-तीन लाखांचे आहेत, ते जे बदलत असतात. त्यांचे शर्ट पाहाल तर त्यांची किंमत 50 हजारांपासून सुरु होते. टी शर्ट पाहिलं तर त्याची किंमत 30 हजार रुपयांपासून सुरु होते. वानखेडेंच्या हातातील घड्याळं दररोज बदलतात, ज्यांची किंमत 20 हजारांपासून सुरु होते, ती 1 कोटींपर्यंत किमतीची आहेत. एका प्रमाणिक अधिकाऱ्याचं हे राहनीमान? मी प्रार्थना करतो की, देशातील सर्व प्रामाणिक लोकांचं राहणीमान असंच व्हावं."


पेहरावावरुन केलेल्या नवाब मलिकांच्या आरोपांना समीर वानखेडेंचं प्रत्युत्तर


मुंबई ड्रग्ज केस प्रकरणानंतर (Mumbai Drugs Case) राज्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरु आहेत. अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर आरोपांची माळ लावत धमाका उडवून दिलाय. नवाब मलिकांच्या सर्व आरोपाचं समीर वानखेडे यांनी खंडन केलं असून प्रत्युत्तर दिलं आहे. महिनाभरापासून नवाब मलिक दररोज नवनवीन आरोप करत पुरावे सादर करत आहेत. ड्रग्ज प्रकरणावरुन सुरु झालेले आरोप व्हाया वसूली समीर वानखेडे यांच्या कपड्यापर्यंत पोहचले आहेत. समीर वानखेडे यांनी या सर्व आरोपांचं खंडन केलं आहे. 


महागड्या पेहरावावरुन आरोप करणाऱ्या नवाब मलिका यांना समीर वानखेडे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. माझ्या महागड्या कपड्यांची फक्त अफवा आहे, मलिकांना त्याविषयी कमी माहिती आहे. त्यामुळे त्यांनी खरी माहिती शोधून काढावी, असं आव्हान समीर वानखेडेंनी मलिकांना दिलंय. समीर वानखेडे (Sameer Wankhede) सत्तर हजारांचं शर्ट वापरतात, एक लाख रुपयांची पँट वापरतात आणि दोन लाख रुपयांचे शूज वापरतात, असा आरोप नवाब मलिकांनी केला होता. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :