मुंबई : शिक्षक भरतीच्या माध्यमातून ज्या उमेदवारांची निवड (BMC Shikshak Bharati Update)  झालेली आहे, परंतु ज्या उमेदवारांचे समुपदेशन अद्याप बाकी आहे अशा उमेदवारांचा आक्रोश सध्या पाहायला मिळत आहे. राज्यातील इतर ठिकाणच्या उमेदवारांचे समुपदेशन होऊन बहुतांश उमेदवारांना त्यांची नियुक्तीची ठिकाणंही जाहीर करण्यात आली आहेत. मात्र मुंबई महापालिकेचा कारभार मात्र वेगळा असल्याचं दिसतंय. बीएमसीच्या शिक्षण विभागाकडून नियुक्त झालेल्या उमेदवारांचे अद्याप समुपदेशन झालं नाही.


शाळा सुरू होण्यास सध्या काहीच दिवस बाकी असून उमेदवारांचे समुपदेशन कधी होणार आणि त्यांना नियुक्ती कधी मिळणार याची मात्र अनिश्चितता असल्याचं दिसतंय. त्यामुळे लवकरात लवकर समुपदेशन करून नियुक्ती देण्यात यावी अशी मागणी उमेदवारांकडून करण्यात आली आहे. 


फक्त डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन झालं


फक्त बीएमसीमध्ये ही प्रक्रिया राहिली असून कागदपत्रे तपासून कुणी पात्र ठरलं आणि कुणी अपात्र ठरलंय याचीही माहिती अद्याप जाहीर झाली नाही. 15 जूनपर्यंत शाळा सुरू होणार असून त्या आधी या उमेदवारांचं समुपदेशन होऊन त्यांना नियुक्तीचे ठिकाण समजावं अशी मागणी करण्यात येत आहे.


राज्यात अनेक जिल्हा परिषदा असतील किंवा नगरपालिका, महानगरपालिका असतील, त्या-त्या ठिकाणी समुपदेशन प्रक्रिया पूर्ण करून नियुक्ती कोणत्या ठिकाणी करण्यात आली आहे हे जाहीर करण्यात आलंय. मात्र मुंबई महानगरपालिकेमध्ये ज्या उमेदवारांचे या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे त्या उमेदवारांचं फक्त डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं आहे. बाकी प्रक्रिया मात्र अपूर्णच राहिल्याचं दिसतंय.


काय आहेत उमेदवारांच्या मागण्या? 


शिक्षण सेवक किंवा शिक्षण सेविका या पदाकरिता पात्र असलेल्या उमेदवारांचे समुपदेशन करण्याकरिता वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. त्यामध्ये त्यांनी असं सांगितलं आहे की पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरती प्रक्रिया मधून 25 फेब्रुवारी 2024 रोजी जाहीर झालेल्या, मुंबई महानगरपालिका अधिनस्त प्राथमिक शिक्षण सेवक पदाची आमची निवड झालेली असून त्या अनुषंगाने दिनांक 4 मार्च ते 12 मार्च रोजी सर्व शैक्षणिक कागदपत्रांची पारदर्शक पद्धतीने व्हेरिफिकेशन झालं आहे.


16 मार्च 2024 रोजी लोकसभेची आदर्श आचारसंहिता लागू झाल्याने पुढील प्रक्रिया राबविता येणार नसल्याचे जाहीर करण्यात आलं होतं. परंतु आता संपूर्ण महाराष्ट्राचे आदर्श आचारसंहिता मुक्त झालेला आहे. त्यामुळे आम्हा लोकांना आता तात्काळ या ठिकाणी जॉयनिंग देण्यात यावे. 


मुंबई महानगरपालिका येथे 798 जणांची शिक्षण सेवक पदावर शिफारस निवड करण्यात आलेली असून शिफारस केलेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी प्रक्रिया सुद्धा पूर्ण झालेली आहे. त्यामुळे लवकरात लवकर समुपदेशन प्रक्रिया पूर्ण करावी आणि पात्र शिक्षकांना पदस्थापनेची माहिती द्यावी.


ही बातमी वाचा: