Share Market Update : शेअर बाजार उघडताच गडगडला आहे. बाजार उघडताच सेन्सेक्स (Sensex) आणि निफ्टी (Nifty) घसरले. सेन्सेक्स 300 अंकांनी कोसळला आहे तर, निफ्टी 100 अंकांनी खाली घसरला आहे. मागील तीन दिवसात सेन्सेक्स 1800 हून अधिक अंकांनी गडगडला आहे. इतकेच नाही तर, मागील तीन दिवसात 6.56 लाख कोटींचे गुंतवणूकदारांचे नुकसान झाले आहे. भारतीय बाजारातून परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून निधीचे निर्गमन सुरु असल्याने गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. सोबतच जागतिक पातळीवर भू-राजकीय तणाव आणि तेलाच्या किमतीत होत असलेल्या वाढीमुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.


कमकुवत जागतिक संकेतांमुळे शुक्रवारी सकाळी शेअर बाजार तोट्याने उघडला. सेन्सेक्स व्यापाराच्या सुरुवातीच्या मिनिटांत 700 अंक किंवा 1.25 टक्क्यांपेक्षा जास्त घसरून 58,700 च्या जवळ आला तर NSE निफ्टी 17,550 च्या खाली घसरला होता. बँक निफ्टी 1.6 टक्क्यांपेक्षा जास्त घसरला. पॉवर ग्रिड आणि हिंदुस्थान युनिलिव्हर हे दोनच शेअर्स सेन्सेक्समध्ये वाढले. बजाज फिनसर्व्ह 3 टक्क्यांनी टॉप ड्रॅग म्हणून खाली आले, त्यानंतरच्या क्रमांकांवर टेक महिंद्रा आणि डॉ रेड्डीजचे शेअर होते.





 


महागाईचा भडका उडाल्याने शेअर बाजार सलग चौथ्या सत्रात गडगडला आहे. कोरोनाची तिसरी लाट आणि इंधन दरवाढीचा मोठा परिणाम शेअर बाजारावर झाल्याचे पाहायला मिळतेय. जागतिक कमॉडिटी बाजारात कच्च्या तेलाचा भाव 88 डॉलर इतका आहे. वाढत्या महागाईमुळे बाजारात मोठी पडझड होण्याची शक्यताही तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.


इतर महत्त्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha