Mumbai Airport : देशातील सर्वात व्यस्त विमानतळांपैकी एक असलेल्या मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Chhatrapati Shivaji Maharaj International Airport) सर्व्हर डाऊन झाल्यामुळे मागील 20 मिनिटांपासून चेक इन करताना प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. नियोजित फ्लाईट्स बुकिंग केलं असताना विमानतळावर चेक इनसाठी गर्दी झालेली पाहायला मिळाली. मात्र, आता चेक इन, बोर्डिंग पास आणि इतर इंटरनेट कनेक्ट असलेल्या सेवा ह्या दोन तासांनी पूर्ववत झाल्या आहेत.


या संदर्भात मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सीआयएसएफ यांनी दिलेल्या माहितीनुसार, “आमच्या प्रवाशांना विनंती आहे की त्यांनी चेक-इनसाठी अतिरिक्त वेळ द्यावा आणि त्यांच्या संबंधित एअरलाइन्सशी संपर्क साधावा. कारण शहरात सुरू असलेल्या विकास कामांमुळे विमानतळाबाहेर तात्पुरता नेटवर्क व्यत्यय आला आहे. आमची टीम उपस्थित आहे आणि सर्व प्रवाशांच्या सोयीसाठी मॅन्युअल प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत आणि आमच्या प्रवाशांनी समजून घेतल्याबद्दल त्यांचे आभारी आहोत.”


सर्व्हर डाऊन झाल्यामुळे हा प्रॉब्लेम झाल्याचं सांगण्यात येत आहे. ही तांत्रिक अडचण सोडविण्यासाठी विमानतळ प्रशासन पूर्णपणे काम करत असून लवकरच सेवा पूर्ववत करण्यात येईल, असं विमानतळ प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. 


विमानतळाचे सर्व्हर पूर्णपणे डाऊन झाल्यामुळे प्रवासी डेटासंबंधी संपूर्ण काम ठप्प झाले आहे. प्रवाशांची तपासणी, बॅगेज काऊंटर, चेक इन, बोर्डिंग पास देणे सारे काही थांबलेले आहे.






या संदर्भात मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सीआयएसएफ यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर सर्व्हर डाऊन असल्याने गर्दी सामान्यपेक्षा थोडी जास्त आहे. गर्दीचे व्यवस्थापन व्यवस्थित केले जात आहे आणि मॅन्युअल पास दिले जात असल्याने गोंधळ नाही असे म्हटले आहे. 






अनेक ट्विटर यूजर्सनी गर्दीचे फोटो शेअर केले आहेत. या संदर्भात एअर इंडियाने (Air India) ट्विट करत उत्तर दिले आहे की, "आम्ही समजतो की विलंब नक्कीच अस्वस्थ करणारा आहे. आमची टीम गैरसोय कमी करण्यासाठी परिश्रमपूर्वक काम करत आहे. पुढील अपडेटसाठी ते तुमच्या संपर्कात राहू."


महत्वाच्या बातम्या : 


Mumbai Home Buying:  मुंबईत घर खरेदीकडे ओढा, मागील वर्षीच्या तुलनेत नोव्हेंबर महिन्यात 15 टक्क्यांची वाढ