Mumbai University मुंबई: सिनेट निवडणुकीच्या मतदार नोंदणीची पुन्हा एकदा तपासणी करण्याची शिवसेना शिंदे गटाकडून मागणी करण्यात आली आहे. 22 सप्टेंबर रोजी होणाऱ्या सिनेट निवडणुकीच्या मतदार यादीमध्ये पारदर्शकता आणावी, यासाठी शिवसेना शिंदे गटाच्यावतीने मुंबई विद्यापीठाच्या (University Of Mumbai) कुलगुरूंना पत्र लिहून ही मागणी केली आहे. 


सिनेट निवडणूक जाहीर होण्याआधी जवळपास एक लाख 25 हजार मतदार नोंदणी करण्यात आली होती त्यातील 93 हजार मतदार हे पात्र ठरले होते. मात्र,त्यानंतर भाजप आणि अभाविप कडून जाहीर करण्यात आलेल्या अंतिम मतदार यादीवर आक्षेप घेण्यात आला होता आणि त्यामुळे पुन्हा एकदा नोंदणी करण्याचे निर्देश देण्यात आले होते. दरम्यान, विद्यापीठाच्या सिनेटची मुदत सप्टेंबर 2022 मध्ये संपुष्टात आली होती. त्यानंतर लागलीच नवी सिनेट निवडून येणे अपेक्षित होते. मात्र, विद्यापीठाने 22 नोव्हेंबर 2022 मध्ये निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला.


मतदार नोंदणीच्या फक्त दहा टक्के मतदार पात्र- 


नव्याने मतदार नोंदणी केल्यानंतर 26000 मतदारांची नोंदणी नव्याने करण्यात आली त्यातील स्क्रुटीनेमध्ये फक्त 13406 मतदार हे पात्र ठरले. म्हणजे एकूण 1,25,000 हजारच्या मतदार नोंदणीच्या फक्त दहा टक्के मतदार हे पात्र ठरत असल्याने  या अंतिम मतदार यादीवर शिवसेना शिंदे गटाच्यावतीने आक्षेप घेण्यात आला आहे. या सगळ्याची पुन्हा एकदा फेर तपासणी व्हावी अशी मागणी शिवसेना शिंदे गटाच्या वकिलांमार्फत पत्राद्वारे मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंना करण्यात आली आहे. मतदार यादीमध्ये त्रुटी असल्याने यावर तातडीने कार्यवाही करावी, असं विद्यापीठाच्या कुलगुरूंना पत्र लिहून कळवण्यात आला आहे. अन्यथा शिवसेना शिंदे गट न्यायालयीन प्रक्रियेद्वारे या सगळ्याबाबत दाद मागणार असल्याचे पत्रात म्हटलं आहे. 


10 जागांसाठी निवडणूक-


विद्यापीठाने सिनेट निवडणुकीचा कार्यक्रम 4 ऑगस्टला जाहीर केला होता. पदवीधर मतदारसंघाच्या 10 जागांसाठी ही निवडणूक होत आहे. त्यानुसार इच्छुक पदवीधरांना 12 ऑगस्टपर्यंत उमेदवारी अर्ज भरता येणार होते. शेवटच्या दिवसापर्यंत विद्यापीठाकडे 52 अर्ज दाखल झाले होते. त्यात उद्धवसेनेच्या युवासेनेने 10 अर्ज आणि विद्यापीठ विकास मंचाने 10 अर्ज भरले आहेत. त्याचबरोबर छात्र भारती विद्यार्थी संघटनेने तीन अर्ज दाखल केले आहेत.


तरूणाईचा कौल कुणाच्या बाजूनं लागणार?


सीनेटच्या निवडणुकीतुन तरूणाईचा कौल कुणाच्या बाजूनं आहे हे स्पष्ट होईल. सिनेट निवडणुकीत जो बाजी मारेल त्या मुंबई महानगरपालिकेत तरूणांचा पाठिंबा मिळेल असं हे समीकरण आहे. आतापर्यंत मुंबई महानगरपालिकेवर ठाकरेंच्या शिवसेनेची सत्ता पाहायला मिळाली आहे. पण आता शिंदे, मनसे आणि भाजप हे तिघे एकत्र येत असल्यानं मुंबई महानगरपालिकाही ठाकरेंसाठी सोपी नसणार आहे.


संबंधित बातमी:


मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत ठाकरेंची आदित्यसेना अन् अभाविपमध्ये सामना, शिंदेंच्या युवासेनेचा उमेदवारच दिसेना