मुंबई : मुंबई महापालिका क्षेत्रात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. यात मृत्यू होणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्याही जास्त आहे. आतापर्यंत एकट्या मुंबईत 800 जणांना कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईच्या पश्चिम उपनगर असलेल्या वांद्रे-कुर्ला संकुलात मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) पहिल्या टप्प्यातील कोव्हीड-19 रुग्णालय यशस्वीरित्या तयार केलं आहे. त्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यातील कोव्हीड-19 रुग्णालयाच्या प्राथमिक कामाला एमएमआरडीएकडून सुरुवात करण्यात आली आहे.
या कोव्हीड-19 रुग्णालयामध्ये 1 हजार बेडची व्यवस्था करण्यात येणार आहे. तर, पहिल्या टप्प्यातील रुग्णालय यापूर्वीच महापालिकेला हस्तांतरित करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यातील रुग्णालयाच्या पुढे हे तयार करण्यात येणार आहे. या रुग्णालयात 100 आयसीयूची व्यवस्था असलेले बेड, तर उर्वरित 900 बेड हे ऑक्सिजन आणि नॉन ऑक्सिजन असणार आहेत. त्यामुळे या रुग्णालयात गंभीर लक्षणे असणाऱ्या रुग्णांवर देखील उपचार करण्यात येणार आहेत. यापूर्वी, पहिल्या टप्प्यातील रुग्णालय हे पंधरवड्यापेक्षा कमी कालावधीत एमएमआरडीए कडून तयार करण्यात आले होते. हे रुग्णालय एमएमआरडीएचे आयुक्त आर. ए. राजीव यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत महानगरपालिकेकडे सुपूर्द केले.
मुंबई मनपाकडून डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी कामाचं नवं वेळापत्रक
बीकेसीत कोरोना रुग्णांना दाखल करणार
महापालिकेने बीकेसीत 1028 रुग्णांसाठीची व्यवस्था पूर्ण केली आहे. शुक्रवारपासून या ठिकाणी कोरोना रुग्णांना दाखल करण्यात येणार असल्याचे पालिकेच्या एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. याशिवाय मुंबईत वेलिंग्टन क्लबसह वेगवेगळ्या ठिकाणी 10 हजार खाटांची व्यवस्था अंतिम टप्प्यात आली आहे. कोरोनाची लागण असलेल्या व थोडे गंभीर असलेल्या रुग्णांना वांद्र्याच्या बीकेसी येथील नव्याने तयार करण्यात आलेल्या रुग्ण व्यवस्थेत शुक्रवारपासून दाखल केले जाणार आहे.
या ठिकाणी 1028 खाटांपैकी पन्नास टक्के खाटांच्या ठिकाणी ऑक्सिजनची व्यवस्था करण्यात आली आहे. ज्या रुग्णांमध्ये करोनाची लक्षणे दिसून आली आहे व ज्यांना ऑक्सिजनची आवश्यकता आहे अशा रुग्णांना येथे दाखल केले जाणार आहे. येथे आयसीयूची गरज असलेल्या गंभीर रुग्णांची व्यवस्था बीकेसीतील एशियन हार्ट हॉस्पिटलमधील आयसीयूत केली जाणार आहे” असे त्यांनी सांगितले. “याशिवाय गोरेगाव येथील नेस्कोमध्ये 1000 खाटांची व्यवस्था करण्यात आली असून लवकरच येथे एकूण 2600 खाटांची व्यवस्था केली जाईल”, असे अतिरिक्त पालिका आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.
कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यात ठाकरे सरकार अपयशी : चंद्रकांत पाटील