मुंबई : सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणी राज्य सरकारने आपली भूमिक स्पष्ट केली आहे. आजवर सुशांतसिंह राजपूत प्रकरणी सीबीआय तपासाला राज्य सरकारचा विरोध होता, मात्र सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं आता सरकारने स्वागत केलं आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटलं की, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो. सीबीआयला तपासाला आवश्यक असल्यास आम्ही सर्व सहकार्य करु असंही अनिल देशमुख यांनी म्हटलं.


मुंबई पोलिसांचा अभिमान वाटतो कारण मुंबई पोलिसांनी याप्रकरणी चांगला तपास केला. सुप्रीम कोर्टाने आपल्या आदेशात मुंबई पोलीस तपासात दोष आढळला नाही असं निरीक्षण नोंदवलं आहे. मुंबई पोलिसांनी योग्य तपास केला हे यावरून स्पष्ट होतं आहे.


सुशांतसिंह राजपूत प्रकरणाचं विरोधी पक्षनेते राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत. बिहारमधील आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे सुरु आहे. या निवडणुका लक्षात घेऊन काही नेते राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण मुंबई पोलिसांनी योग्य पद्धतीने तपास केला, असं सुप्रीम कोर्टाने म्हटल्याने विरोधी पक्षाला योग्य उत्तर मिळालं आहे, असं अनिल देशमुख यांनी म्हटलं.


डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या राज्यघटनेत संघराज्याची जी संकल्पना आहे त्याबाबत घटनातज्ज्ञांनी विचारमंथन करावं, असं अनिल देशमुख म्हणाले. सीबीआयला तपास द्यावा की नाही, याबाबत राज्य सरकार निर्णय घेतो. राज्य सरकारने एनओसी दिली की तो तपास सीबीआयकडे जातो. पण सुप्रीम कोर्टाने निर्णय दिल्यानंतर त्यापद्धतीने राज्य सरकार सीबीआयला सहकार्य करेल.


SSR Case SC Verdict | सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआय करणार, सुप्रीम कोर्टाचा निकाल 


सुप्रीम कोर्टाने आज (19 ऑगस्ट) हा अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयने करण्याचा निकाल दिला. मुंबई पोलिसांनी सीबीआयला संपूर्ण सहकार्य करण्याचा आदेश सुप्रीम कोर्टाने दिला आहे. तसंच गोळा केलेले सर्व पुरावे सीबीआयला सोपवण्याचे निर्देशही मुंबई पोलिसांना दिले आहेत. महाराष्ट्राला सरकारलाही निकालाचं पालन करावं लागेल, असंही कोर्टाने स्पष्ट सांगितलं.


सुप्रीम कोर्टाने म्हटलं की, मुंबई पोलिसांनी या प्रकरणात तपास नाही केवळ चौकशी केली होती. सुप्रीम कोर्टच्या या निकालानंतर महाराष्ट्र सरकार आणि मुंबई पोलिसांना मोठा झटका बसला आहे. दरम्यान महाराष्ट्र सरकार सुप्रीम कोर्टाच्या या निकालाला आव्हान देऊ शकतं.


संबंधित बातम्या




CBI Probe in SSR Case | सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा तपास सीबीआय करणार