मुंबई : मुंबई आयआयटीचा 58 वा दीक्षांत समारंभ 23 ऑगस्टला दुपारी दीड वाजता होणार असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा दीक्षांत समारंभ व्हर्च्युल रिऍलिटी मोडमध्ये होणार आहे. यासाठी 2016 नोबल पुरस्कार विजेते प्राध्यापक डूनकान हॅलडने त्यासोबतच ब्लॅकस्टोनचे चेअरमन स्टिफन स्क्वारजमन हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. हा संपूर्ण दीक्षांत कार्यक्रम डीडी सह्याद्रीवर प्रक्षेपित होणार असून विद्यार्थी त्यांचे नातेवाईक, मित्रपरिवार हा कार्यक्रम बघू शकणार आहेत.

शिवाय, डीडी सह्याद्रीवर प्रक्षेपित होत असल्याने अगदी ग्रामीण भागात सुद्धा हा कार्यक्रम इंटरनेट सेवा उपलब्द नसताना सुद्धा पाहता येणार आहे. त्यासोबतच युट्युब, फेसबुक वर सुद्धा या कार्यक्रमाचा लाइव्ह स्ट्रिमिंग केलं जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून विचार करत अशाप्रकारे व्हर्च्युल रिऍलिटी माध्यमातून हा दीक्षांत समारंभ पार पडणार आहे. विद्यार्थ्यांचा आयआयटी संस्थेतून डिग्री मिळण्याचा आनंद हिरावून जाता कामा नये यासाठी अशाप्रकारे दीक्षांत समारंभ पार पडणार आहे.

सरकारी नोकरींसाठी आता देशभरात एकच सामायिक परीक्षा होणार! मोदी सरकारचा निर्णय

विद्यार्थ्यांना मिळणार अनिमेटेड रूप
यामध्ये दीक्षांत समारंभाची रूपरेषा पाहिली तर अगदी दरवर्षीप्रमाणे पारंपरिक दीक्षांत समारंभ पार पडतो. अगदी त्याचपद्धतीने आयआयटी मुंबई डिरेक्टर, प्रमुख पाहुणे यांच्या भाषणाने कार्यक्रम सुरू होईल. व्हर्च्युल रिऍलिटीचा अनुभव घेताना विद्यार्थ्यांना आपले अनिमेटेड रूप पाहायला मिळेल, शिवाय त्याच पद्धतीने मेडल्स, अवॉर्डस, डिग्री विद्यार्थ्यांना प्रदान केली जाणार आहे. त्यासोबत विद्यार्थ्याचे फोटो, नाव प्रक्षेपणावेळी दाखवले जाणार आहे. अगदी शेवटी सर्व विद्यार्थी एकत्रित प्रतिज्ञा कार्यक्रमाच्या शेवटी घेणार आहेत.

Anil Parab | राज्यात उद्यापासून आंतरजिल्हा एसटी प्रवासाला परवानगी : अनिल परब


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI