Santacruz Hotel Fire : मुंबईतील सांताक्रूझ येथील गॅलेक्सी हॉटेलला भीषण आग (Santacruz Galaxy Hotel Fire) लागल्याची घटना घडली आहे. या आगीत तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. तर पाच जण जखमी झाले आहेत. आगीची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. दरम्यान, अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. जखमींना व्ही एन देसाई रुग्णालयात दाखल केले आहे.
आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश
गॅलेक्सी बिल्डिंगमधील तिसऱ्या मजल्यावरील गॅलेक्सी हॉटेलमध्ये भीषण आग लागली. ही चार मजली इमारत आहे. रुग्णालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रुपल कांजी (वय 25), किशन (वय 28) आणि कांतीलाल गोरधन वारा (वय48) या तिघांचा मृत्यू झाला आहे. अल्फा वखारिया (वय 19) आणि मंजुला वखारिया (वय) 49 अशी दोन जखमींची नावे आहेत. अन्य तीन जण देखील जखमी झाले आहेत.
दरम्यान, आग आटोक्यात आल्यानंतर अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी पाच जणांची सुटका करून त्यांना व्ही.एन.देसाई रुग्णालयात हलवले आहे. खोली क्रमांक 204 मध्ये ही आग लागली होती. त्यांनतर ती तिसऱ्या मजल्यावर पोहोचली. धूर आणि आगीच्या भक्ष्यस्थानी एकूण आठ जण आले होते. ज्यामध्ये ती जणांचा मृत्यू झाला आहे.
आगीच्या घटनेची चौकशी करण्यात येणार
दरम्यान, आगीचे कारण स्पष्ट झालेले नाही. अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले त्यावेळी धूर होता. खिडक्या तोडून लोकांना बाहेर काढण्यात आले. हॉटेलमध्ये अग्निशमाक यंत्रणा होती. पण ती खूप जुनी होती. यात काही निष्काळजीपणा आहे का? याची चौकशी केली जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या: