मुंबई : ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ पुस्तकावरुन भाजपवर चौफेर टीका होत असताना. या पुस्तकावर हल्लाबोल करणाऱ्या कोल्हापूरचे छत्रपती संभाजी राजे आणि शिवसेना खासदार संजय राऊत याच्यामध्येच वाग्युद्ध रंगलंय. भाजपमध्ये असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या वारसदारांनी राजीनामे द्यावे अशी मागणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे. तसेचं या पुस्ताकाविरोधात महाराष्ट्रातील जनता बोलतं आहे. त्यामुळे छत्रपतींच्या गादीच्या वारसदारांनी या विषयावर बोललंच पाहिजे असं मतं संजय राऊत यांनी व्यक्त केलं आहे. सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत आज के शिवाजी-नरेंद्र मोदी या पुस्तकावर बोलताना राऊतांनी हे टीकास्त्र सोडलंय.


सातारा गादीचे वारसदार श्रीमंत उदयन राजे, श्रीमंत शिवेंद्रराजे आणि कोल्हापूरचे छत्रपती संभाजी राजे या सर्वांचा आदर आहे. त्या गाद्यांचा आम्ही सन्मान करतो. त्या सर्वांना आम्ही जर यावर भूमिका घ्या असं बोललो तर त्यात चुकीचं काय? असा सवाल यावेळी राऊतांनी उपस्थित केला.

छत्रपती शिवाजी महाराज हे राज्याचं दैवत, त्यांची तुलना कोणाशीच होऊ शकत नाही. नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत त्यांचा आदर आहे, पण नरेंद्र मोदींची छत्रपती शिवाजी महाराजांसोबत तुलना चुकीची असल्याचं बोलत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली आहे.

Book on PM Modi | 'आज के शिवाजी-नरेंद्र मोदी' पुस्तकाचं दिल्लीत प्रकाशन, देशभरातून पुस्तकावर टीका | ABP Majha



मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी या विषयावर माझी सविस्तर चर्चा झाली आहे. त्यांनी मला सांगितले की आपली भूमिका योग्य आहे. छत्रपती शिवाजी महाराजसंदर्भात जर राज्यातील जनता भूमिका घेत असेल तर छत्रपतींच्या वंशजांनीसुद्धा यावर भूमिका स्पष्ट करायला पाहिजे. कारण छत्रपतींची तुलना होणं हा राज्याचा अपमान असही राऊत म्हणाले.

तसेच माला खात्री आहे की, महाराष्ट्रमधील भाजपचे नेते आज संध्याकाळपर्यंत आपली भूमिका स्पष्ट करतील. भाजपचे नेते विविध विषयांवर आपली भूमिका तात्काळ मांडत असतात. तसंच या विषयीही त्यांनी लवकर आपली भूमिका मांडावी असं मत राऊंतानी व्यक्त केलं आहे. या विषयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दोष नाही. त्यांच्या पाठी काही लोक चमकण्याचं काम करत असताता. त्यासाठीचंल ते अशी काम करतात असही राऊत म्हणाले.

मोदींवरील पुस्तकावरुन संभाजीराजे छत्रपती आणि संजय राऊतांमध्ये खडाजंगी

दरम्यान, दिल्ली भाजपचे नेते जयभगवान गोयल यांनी हे पुस्तक लिहिले आहे. काल (12 जानेवारी) भाजपचे दिल्ली प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी, प्रभारी श्याम जाजू, माजी खासदार महेश गिरी या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. दिल्लीमध्ये लवकरच विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत त्या पार्श्वभूमीवर एका धार्मिक सांस्कृतिक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते, त्यामध्ये या पुस्तकाच्या प्रकाशनाचा कार्यक्रम पार पडला.

या पुस्तकाद्वारे मोदींची तुलना छत्रपती शिवरायांशी करण्यात आल्याने त्याबद्दल राजकीय वर्तुळातून संतप्त प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ही तुलना न पटणारी आहे, अशा पद्धतीचे ट्विट केले आहे. 'जगाच्या अंतापर्यंत दुसरे छत्रपती शिवाजी महाराज होणे नाही. असेही त्यांनी म्हटलं आहे. तर काँग्रेसचे माजी खासदार राजीव सातव यांनीही अशा पद्धतीने तुलना करपन भाजपने छत्रपती शिवरायांचा अपमान केल्याची टीका केली आहे.

Rajiv Satav on PM Modi's Book | छत्रपती शिवाजी महाराजांची कुणाशीही तुलना केली जाऊ शकत नाही - राजीव सातव | ABP Majha