Sanjay Raut on Kirit Somaiya : देशाच्या राजकारणात बदल घडत असून 2024 नंतर स्वच्छ आणि पारदर्शी सरकार येणार आहे. त्यानंतर देशाच्या राजकारणातून सोमय्यासारखे XXX लोक नाहीसे होतील अशी शेलक्या शब्दात शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी टीका केली. मागील काही दिवसांपासून भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या आणि शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. 


तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. या भेटीवरून किरीट सोमय्या यांनी टीका केली होती. त्याला उत्तर देताना संजय राऊत यांनी सोमय्यांवर टीका केली. तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना भेटण्याआधी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची परवानगी घेतली होती का, असा खोचक सवाल भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केली होती. याबाबत पत्रकारांनी विचारले असता संजय राऊत यांनी सोमय्यांवर शेलक्या शब्दात टीका केली. संजय राऊत यांनी म्हटले की, देशाच्या राजकारणात बदल घडत आहेत. वर्ष 2024 नंतर देशात स्वच्छ आणि पारदर्शी सरकार येणार आहे. त्यामुळे सोमय्यासारखी xxxलोक राजकारणातून संपतील. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याबाबत असे वक्तव्य करणे हा राज्याचा अपान आहे. राज्यातील नागरिकांचा अपमान आहे. महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्याला केंद्र सरकार सुरक्षा देते असेही राऊत यांनी म्हटले.


तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव आज मुंबईत, ठाकरे-पवारांची भेट घेणार


तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (k chandrasekhar rao) आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) आणि शरद पवार (sharad Pawar) यांची भेट घेणार आहेत. दोन दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंनी के. चंद्रशेखर राव यांना फोन करुन मोदींविरोधातील लढ्याला पाठिंबा दिला होता. आज उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर चंद्रशेखर राव हे शरद पवारांची देखील भेट घेणार आहेत. दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांमध्ये होणारी भेट राजकीय चर्चा होणार असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले. केंद्रातील भाजप सरकारकडून बिगरभाजप राज्यांचा छळ सुरू आहे. त्यांची कोंडी करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे राऊत यांनी सांगितले. त्याविरोधात एक असून एक अजेंडा ठरवणार असल्याचे त्यांनी सांगितले. 


इतर महत्त्वाच्या बातम्या:



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha