Sanjay Raut on Kirit Somaiya : शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी आता थेट ईडी अधिकाऱ्यांवर आरोप केले आहेत. संजय राऊत यांनी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर निशाणा साधताना ई़डी अधिकाऱ्यावर आरोप केले आहेत. किरीट सोमय्या यांनी तीन प्रश्नांची उत्तरे द्यावी असे आव्हान संजय राऊत यांनी केले आहे. संजय राऊत यांनी त्याबाबतचे ट्वीट केले असून त्यांनी पंतप्रधान कार्यालयालाही त्यात नमूद केले आहे. मागील काही दिवसांपासून संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांच्याविरोधात आघाडीच उघडली आहे. 


संजय राऊत यांनी ट्वीट करताना म्हटले की,  किरीट सोमय्या तुम्हाला सर्व गोष्टी माहिती आहेत. त्यामुळे या प्रश्नांची उत्तरे द्याल अशी अपेक्षा असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले. 


> संजय राऊत यांनी विचारलेले प्रश्न 


1. पालघरमधील वेवूर येथील नीरव डेव्हलपर्समध्ये 260 कोटी रुपयांची कोणी गुंतवणूक केली आहे?
2. निकॉन ग्रीनव्हिले या प्रकल्पात नील सोमय्या आणि मेधा सोमय्या संचालक आहेत का?
3. ईडीच्या कोणत्या सहसंचालकाने या प्रकल्पात बेनामी गुंतवणूक केली आहे. 




 






'सोमय्या देशातील सर्वात मोठा चोर, भाजपला भुतानं झपाटलंय'


दरम्यान, शुक्रवारी शिवसेना नेते संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांच्यावर टीका केली होती. भाजपचे लोकं मराठी माणसांना संपवू पाहत आहेत. हे सगळे अन्वय नाईकांचे हत्यारे आहेत. आणि आता तेच त्या जमिनीवर जात आहेत, असं राऊत म्हणाले. त्यांना कुठं जायचं तिथं जाऊ द्या, ते काय नेल्सन मंडेला आहेत का? ते काय क्रांतीकारी आहेत काय? ते चोर आणि लफंगा आहेत, सोमय्या देशातील सर्वात मोठा चोर आहेत, असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटले. 


अन्वय नाईक यांना आत्महत्या का करावी लागली यावर या लोकांनी बोलायला हवं. नाईकांना ज्यांच्यामुळं आत्महत्या करावी लागली त्या गुन्हेगारांच्या समर्थनार्थ हे लोक उतरले होते. एका मराठी माणसानं भाजपच्या दबावामुळं आत्महत्या केली असा आरोपही राऊत यांनी केला. 


इतर महत्त्वाच्या बातम्या:



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha