Sanjay Raut LIVE : संजय राऊत यांना 4 ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी

Sanjay Raut Arrest  :  शिवसेनेचे फायरब्रँड नेते खासदार संजय राऊत संजय राऊत (Sanjay Raut Case)  यांना ईडीनं (ED) अटक केली आहे. यासंदर्भात प्रत्येक अपडेट्स एका क्लिकवर पाहा...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 01 Aug 2022 05:45 PM

पार्श्वभूमी

Sanjay Raut Arrest  :  शिवसेनेचे फायरब्रँड नेते खासदार संजय राऊत संजय राऊत (Sanjay Raut Case)  यांना अखेर रात्री ईडीनं (ED) अटक केली. तब्बल 17 तासांच्या चौकशीनंतर ईडीच्या कार्यालयात राऊत यांना रात्री...More

Nagpur : शिवसैनिकांकडून महामार्गावरील वाहतूक अडविण्याचे प्रयत्न

नागपूरः शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावरील ईडीच्या कारवाईविरोधात राज्यभरात शिवसेनेकडून विरोध होत असताना नागपुरातील वाडी परिसरात महामार्गावर शिवसैनिकांकडून वाहतूक अडविण्याचे प्रयत्न करण्यात आला. नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यातील शिवसैनिकांनी वाडी परिसरात एमआयडीसी टी पॉइंट वर दुपारी चारच्या सुमारास आंदोलन करत केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. काही वेळाने कार्यकर्त्यांनी महामार्गावर येत वाहतूक अडवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी आधीच मोठा बंदोबस्त महामार्गावर ठेवल्याने शिवसैनिक चक्का जाम करू शकले नाही. मात्र त्यामुळे हिंगणा एमआयडीसी टी पॉइंट वर काही प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती.