Sanjay Kadam IT Raid : परिवहन मंत्री अनिल परबांचे निकटवर्तीय मानले जाणाऱ्या संजय कदम यांच्या घरी देखील आयकर विभाग धडकलं आहे. संजय मानजी कदम हे शिवसेनेच्या अंधेरी पश्चिम मतदारसंघाचे संघटक आहेत. त्यांच्या घरी आयकर विभागाची छापेमारी सुरु आहे. दरम्यान, आज सकाळपासूनच पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय राहुल कनाल यांच्या घरीही आयकर विभागाची धाड पडली. एकाच दिवसात शिवसेनेशी संबंधित दोघांच्या घरावर आयकर विभागानं छापेमारी केल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.
आयकर विभागानं शिवसेनेच्या मंत्र्यांच्या निकटवर्तीयांकडे आपला मोर्चा वळवला आहे. एकीकडे आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय राहुल कनाल यांच्या घरी आयकर विभागानं छापेमारी सुरु आहे. तर दुसरीकडे परिवहन मंत्री अनिल परबांचे निकटवर्तीय मानले जाणाऱ्या संजय कदम यांच्या घरी देखील आयकर विभागानं धाड टाकली आहे. संजय मानजी कदम हे शिवसेनेच्या अंधेरी पश्चिम मतदारसंघाचे संघटक आहेत.
पाहा व्हिडीओ : केंद्रीय संस्था भाजपची प्रचार यंत्रणा झाली, दिल्लीसमोर महाराष्ट्र झुकणार नाही
पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांचे निकटवर्तीय तसेच शिर्डी संस्थानाचे विश्वस्त राहुल कनाल यांच्यापाठोपाठ परिवहन मंत्री अनिल परबांचे निकटवर्तीय संजय कदम यांच्या घरी आज आयकर विभागानं छापेमारी केली आहे. शिवसेना उपनेते आणि स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव (Yashwant Jadhav) यांच्या घरावर आयकर विभागानं काही दिवसांपूर्वी धाडी टाकल्या होत्या. जवळपास चार दिवस हे धाडसत्र सुरु होतं. अशातच आता ठाकरेंशी संबंधित दोघांच्या घरावर आयकर विभागानं छापेमारी केली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, शिवसेना नेते संजय राऊत यांची आज दुपारी पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेत त्यांनी तपास यंत्रणांचा भ्रष्टाचार उघड करणार असल्याचं जाहीर केलं आहे. त्यापूर्वीच शिवसेना नेत्यांचे निकटवर्तीय आयकर विभागाच्या रडारवर असल्यानं राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Rahul Kanal IT Raid : शिर्डी देवस्थानाचे विश्वस्त राहुल कनाल यांच्या घरी आयकरची छापेमारी
- Sanjay Raut Press Conferance : तीच वेळ, तेच स्थळ, टार्गेटवर कोण? संजय राऊतांची आज दुपारी 4 वाजता पुन्हा पत्रकार परिषद