Sandeep Deshpande on BMC: मुंबई महानगर पालिकेच्या कचरा घोटाळा प्रकरणावरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आक्रमक पवित्रा घेतला आहे. कचरा घोटाळ्याविरोधात मनसेने काल महापालिकेच्या आयुक्त भूषण गगराणी यांच्यासमोर राडा घातल्यानंतर आज कचरा घोट्याळ्यातील कंत्राटदार मुंबई मनपा घोटाळ्यात दिसून आल्यानंतर चांगलाच हल्लाबोल केला आहे. आम्हाला न भेटणारे आयुक्त कंत्राटदारांना भेट देतात हे "भूषणवाह "नाही. आमची करडी नजर आहे. लक्षात ठेवा गगरानी आमची आहे निगराणी, असा टोला मनसे नेते संदीप देशपांडे यांनी लगावला आहे.
हे भूषणवाह नाही, आमची करडी नजर आहे
संदीप देशपांडे यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, काल मनपामध्ये मनसेने केलेल्या राड्यानंतर आज कचरा घोट्याळ्यातील कंत्राटदार गुरुपाल ,श्रीजू ,मेहता सनी पंड्या मनपा आयुक्तांना भेटून कुठली सेटिंग करत्यात आम्हाला न भेटणारे आयुक्त कंत्राटदारांना भेट देतात हे "भूषणवाह "नाही. आमची करडी नजर आहे. लक्षात ठेवा गगरानी आमची आहे निगराणी. संदीप देशपांडे यांनी पत्रकार परिषद घेत महापालिकेत कचरा घोटाळा होत असल्याची माहिती समोर आणली होती.
कुठल्या प्रकारची सेटिंग होत आहे?
संदीप देशपांडे यासंदर्भात बोलताना म्हणाले की, कचरा घोटाळ्यात आम्ही आतापर्यंत तीन-चार पत्रकार परिषदा घेतल्या आहेत. कचरा कंत्राटामध्ये घोटाळे आहेत आणि टेंडर जाहीर होण्याआधी आम्ही सांगितलं आहे. आयुक्तांकडे भेटीची वेळ मागितली पण त्यांनी वेळ दिलेली नाही. संतोष धुरी यांनी भेटीची वेळ मागितली तेव्हा पालिकेकडून असं सांगितलं की भेटायची वेळ कशाला हवी? मग आम्ही सुद्धा विचारतो की कंत्राटदारांना आयुक्तांना भेटायची गरज काय? कुठल्या प्रकारची सेटिंग महानगरपालिकेमध्ये होत आहे असा आमचा सवाल असल्याचे ते म्हणाले. जे घोटाळे करत आहेत त्यांच्यासाठी रेड कार्पेट टाकत आहेत. आम्ही वारंवार पत्र लिहिले घोटाळे समजावून सांगितले. ते चौकशी करायला तयार नाहीत भेटीची वेळ द्यायला तयार नाहीत.
आयुक्तांच्या बैठकीत गोंधळ
दरम्यान, आयुक्तांकडे वारंवार भेटीसाठी वेळ मागूनही भेट मिळत नसल्याने काल माजी नगरसेवकांसह संतोष धुरी आणि कामगार सेना सरचिटणीस केतन नाईक यांनी आयुक्तांच्या सुरु असलेल्या बैठकीत जाऊन गोंधळ घातला होता. आयुक्त भूषण गगराणी यांनी या टेंडरची प्रक्रिया पूर्ण झाली नसून लेखी उत्तर देण्याचे आश्वासन दिले होते. मुंबई कचरा संकलनात 3 हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे. ठरलेल्या 14 कंपन्यांन्या कंत्राट दिले जाते. वारंवार एकाच कंपन्यांना कंत्राट देण्यामागे राजकीय वदहस्त असल्याचा आरोप देखील कर्मचाऱ्यांनी केली होता.
इतर महत्वाच्या बातम्या