मुंबई : महाराष्ट्राचा छोटा पुढारी म्हणजे घनश्याम दरोडेच्या (Ghanshyam darode) हळदीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. बिग बॉस विजेता सूरज चव्हाणने लग्नगाठ बांधल्यानंतर काही दिवसांत घनश्यामने एक व्हिडिओ शेअर केला असून लग्नाच्या हळदी समारंभाचा हा व्हिडिओ वाटतो. त्यामुळे, सूरजनंतर आता घनश्याम लग्नबंधनात (Marriage) अडकला, छोट्या पुढाऱ्याची पत्नी कोण? वहिनी कोण? अशा कमेंट नेटीझन्सकडून सुरू झाल्या. घनश्यामला अनेकांनी फोन करुनही विचारणा केली. आता, स्वत: घनश्यामने व्हायरल व्हिडिओवर (Video) खुलासा केला असून लवकरच आपण बोहल्यावर चढणार असल्याचं त्याने स्पष्ट केलं. मात्र, माझा हळदीचा व्हिडिओ हा लग्नाचा नसून एका प्रमोशनाचा भाग होता, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Continues below advertisement

दोन तीन दिवसांपूर्वी मी जो व्हिडिओ टाकला, त्या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट करुन मला विचारणा केली. मला अजून सेटल व्हायचं आहे, मी लग्नासाठी मुलगी बघतोय. पण, मुलगी स्वभावाने चांगली असावी, कुटुंब सांभाळणारी असावी अशी मुलगी मी बघतोय. मला अजूक ती मुलगी सापडलेली नाही, आई-वडिलांच्या मनावरती माझं लग्न आहे. माझं अजून लग्न जमलेलं नाही, पण काळजी करु नका आपण तुमच्यासाठी लवकरच वहिनी आणू. मला खूप कॉल येत आहेत, त्रास होत आहे. त्यामुळे, माझी सर्वांना विनंती आहे की, मी जो हळद लावलेला व्हिडिओ शेअर केला तो एका प्रमोशनसाठी केलेला होता. माझं लगीन वगैरे जमलेलं नाही, पण लवकरच जमवुया काळजी करु नका, जर तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये तशी मुलगी असेल तर कळवा, काही अडचण नाही. पण अफवा पसरवू नका की घनश्यामचं लग्न जमलं, घनश्याम बोहल्यावर चढला, असे आवाहन घनश्याम दरोडेने आपल्या चाहत्यांना व्हिडिओच्या माध्यमातून केलं आहे. 

दरम्यान, मला सेटल व्हायचं आहे, मी मुलगी बघतोय मला जेव्हा मुलगी पसंत पडेल तेव्हा मी त्या मुलीशी लग्न करेल. तुम्ही सर्वांना खूप छान प्रतिसाद दिला त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार, लवकरच बोहोल्यावर चढू बर का, असेही घनश्यामने म्हटले आहे. 

Continues below advertisement

कोण आहे घनश्याम दरोडे?

घनश्याम दरोडेचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात एका शेतकरी कुटुंबात झाला. त्याचे बालपण ग्रामीण भागात गरिबीत गेले. उंचीने लहान असला तरी त्याचा आत्मविश्वास अत्यंत मोठा आहे. त्यामुळेच समाजात त्यांना "छोटा पुढारी" हे विशेष नाव मिळालं. घनश्याम दरवडे हा 'बिग बॉस मराठी सीझन 5' या रिअॅलिटी शोमध्ये सहभागी झाला आणि त्यानंतर त्यांची ओळख संपूर्ण महाराष्ट्राला झाली. शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी, शिक्षण व्यवस्था, भ्रष्टाचार यासारख्या विषयांवर घनश्याम दरोडेची मते स्पष्ट आणि ठाम असतात. 

हेही वाचा

मोठी बातमी! केंद्रीय कृषिमंत्र्यांविरुद्ध हक्कभंग ; ओमराजेंसह महाराष्ट्रातील 25 खासदारांच्या सह्या