मुंबई : क्रूझ ड्रग्ज (Cruise Drugs Case) प्रकरणामध्ये झालेल्या विविध आरोपांनंतर एनसीबीचे (NCB) मुंबई झोनल अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्याकडून आर्यन खान (Aryan Khan) ड्रग्ज प्रकरणाचा तपास काढून घेण्यात आल्याची चर्चा सुरु आहे. पण यावर खुद्द समीर वानखेडे यांनीच स्पष्टीकरण दिलं आहे. आर्यन खान आणि इतर पाच प्रकरणांचा तपास आपल्याकडून काढून घेण्यात आला नाही, तो आता केंद्रीय संस्थेच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे असं समीर वानखेडे यांनी सांगितलं आहे. 


समीर वानखेडे एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाले की, "आर्यन खान केस प्रकरणाचा तपास माझ्याकडून काढून घेण्यात आला नाही. या संबंधी मीच न्यायालयात एक रिट पीटिशन दाखल केली होती आणि या प्रकरणाचा तपास केंद्रीय संस्थेकडून करण्यात यावा अशी मागणी केली होती. त्यामुळे आर्यन खान आणि समीर खान यांच्या प्रकरणाचा तपास आता दिल्लीतील केंद्रीय तपास यंत्रणेच्या एसआयटी कडून करण्यात येणार आहे. त्यामुळे हा तपास आता एनसीबीच्या दिल्लीतील आणि मुंबईतील टीममध्ये समन्वयाने करण्यात येणार आहे."


Drugs on Cruise Case : आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात समीर वानखेडे यांची उचलबांगडी


दिल्ली एनसीबीची एक टीम उद्या मुंबईमध्ये येणार आहे. आर्यन खान आणि नवाब मलिकांचे जावाई समीर खान यांच्यासह इतर चार केसचा तपास आता या टीमकडून करण्यात येणार आहे. अरमान कोहली, इक्बाल कासकर, काश्मीर ड्रग्ज या प्रकरणाचा समावेश आहे. दरम्यान मुंबई एनसीबीच्या विभागीय संचालकपदाची जबाबदारी समीर वानखेडे यांच्याकडे कायम राहणार आहे.  या सहा प्रकरणाचा तपास दिल्ली एनसीबीचे अधिकारी संजय सिंग यांच्या नेतृत्वाखाली केला जाणार आहे.


Sameer Wankhede समीर वानखेडेंकडून तपास काढला; नवाब मलिक म्हणतात, ही तर सुरुवात...


समीर वानखडे हे मुंबई एनसीबीचे झोनल डायरेक्टर या पदावर होते आणि त्या पदावरच ते राहणार आहेत.  मात्र ते आता रिपोर्टिंग दिल्ली एनसीबीच्या अधिकाऱ्यांना करणार आहेत. या सहा प्रकरणा व्यतिरिक्त आधीच्या प्रकरणांचा तपास समीर वानखेडे यांच्याकडेच असणार आहे. मात्र नवीन एखादी कारवाई करण्यासाठी आता त्यांना दिल्ली एनसीबीच्या अधिकाऱ्यांना कळवावे लागणार असून त्यांची परवानगी लागणार आहे.


सप्टेंबर 2020 मध्ये त्यांची महसूल गुप्तचर संचालनालयातून एनसीबीवर बदली झाली. अमली पदार्थांशी निगडीत प्रकरणांचे तज्ज्ञ म्हणून त्यांची खास ओळख आहे. आता शाहरुख खानच्या मुलाची चौकशी समीर वानखेडे करत आहेत.


Nawab Malik vs Sameer Wankhede : नवाब मलिकांच्या आरोपांना समीर वानखेडेंचं प्रत्युत्तर