Sameer Wankhede : समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर सक्तवसुली संचनयालाने (enforcement directorate) अर्थात ईडीने काही दिवसांपू्र्वी कारवाई करत गुन्हा दाखल केला होता. दरम्यान, आता समीर वानखेडे यांनी पुढचं पाऊल टाकत उच्च न्यायालयात (High Court) धाव घेतली आहे. ईडीने (enforcement directorate) दाखल केलेल्या गुन्ह्याचा तपास दिल्लीला वर्ग केल्याची माहिती न्यायालयात देण्यात आली होती. हा तपास दिल्लीला वर्ग करणे चुकीचे आहे, असा दावा समीर वानखेडे यांनी केला आहे. समीर वानखेडे यांनी दाखल केलेल्या या याचिकेवर 15 फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार आहे.
मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात समीर वानखेंडेंची चौकशी
अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला ड्रग्ज प्रकरणात अटक केल्यानंतर समीर वानखेडे चर्चेत आले होते. शिवाय, लाच घेतल्याचे आरोपही समीर वानखेडे अडकले होते. या प्रकरणात ईडीकडून त्यांची चौकशी करण्यात आली होती. दरम्यान, न्यायालयाकडून समीर वानखेंना दिलासा मिळणार का? याबाबत चर्चा सुरु आहे.
ड्रग्स प्रकरण नेमकं काय?
समीर वानखेडे हे शारुखचा मुलगा आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी चर्चेत आले होते. आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनसवर आणि मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या कार्डेलिया क्रूझवर एनसीबीकडून छापा टाकण्यात आला होता. यावेळी पाच ग्रॅम मेफ्रेडॉन, 13 ग्रॅम कोकेन, 21 ग्रॅम चरस, एमडीएमएच्या 22 गोळ्या आणि एक लाख 33 हजारांची रोकड जप्त करण्यात आली होती. यावेळी एनसीबीने या क्रूझवरुन आर्यन खानसह आठ जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.
एनसीबीनकडून याप्रकरणी आर्यन खानसह अन्य आरोपींना अटक करण्यात आली होती. त्यानंतर याप्रकरणी आर्यन खानची निर्दोष सुटका झाली. दरम्यान, समीर वानखेडे यांच्या तपास प्रक्रियेवर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. भ्रष्टाचारासह त्यांच्यावर अनेक आरोप करण्यात आले. त्या प्रकरणी सीबीआयने गुन्हा दाखल करत त्यांची चौकशी सुरू केली होती.
आर्यन खानची निर्दोष मुक्तता
शाहरुखचा मुलगा आर्यन खान ड्रग्सप्रकरणात अनेक दिवस तुरुंगात होता. मात्र, मे 2022 मध्ये त्याची तुरुंगातून सुटका झाली. त्याच्याविरोधात कोणताही पुरावा नसल्याचे सांगत मुंबई उच्च न्यायालयाने त्याची निर्दोष मुक्तता केली होती.
इतर महत्वाच्या बातम्या