Sachin Tendulkar: महान भारतीय माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरची (Sachin Tendulkar) प्रतिमा मलिन केल्या प्रकरणी सचिन थेट पोलीस ठाण्यात पोहचला आहे.  सचिन तेंडुलकरच्या  परवानगीशिवाय त्याचं नाव, फोटो आणि आवाजाचा वापर केल्या प्रकरणी   मुंबई पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा नोंदवला आहे. सचिन तेंडुलकरांचे वैयक्तिक सहाय्यक रमेश पारधे यांनी  गुरूवारी सायबर पोलीसात  तक्रार दाखल  केली होती. 


तक्रार करणाऱ्या व्यक्तीने  म्हटले आहे की, एका औषध तयार करणाऱ्या कंपनीने त्यांच्या जाहिरातीमध्ये सचिन तेंडुलकरने उत्पादने वापरल्याचा दावा केला आहे. एवढचं नाही  सचिनहेल्थ डॉट इन नावाची एक बनावट वेबसाईट (Fake Website) असून जी सचिन तेडुंलकरच्या फोटोचा वापर करत उत्पादनाचा प्रचार करत आहे. सचिन तेंडुलकरने देखील यावर प्रतिक्रिया दिला. ऑनलाईनवर काही खरेदी करताना काळजी  घेण्याचे आवाहन केले आहे.


औषधी उत्पादनांच्या जाहिरातींमध्ये सचिन तेंडुलकरचे नाव आणि  फोटो (Sachin Tendulkar Name and Photo) वापरल्याबद्दल वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्सच्या सायबर पोलिसांनी (Cyber Police) अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे  पोलीस सूत्रांनी सांगितले की,  सहाय्यक रमेश पारधे यांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पारधे यांनी पोलिसांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मी 5 मे रोजी सोशल मीडियावर याची पहिली जाहिरात पाहिली. जाहिरातीत सचिन तेंडुलकरचा फोटो होता. तसेच सचिन तेंडुलकर ही उत्पादने वापरत असल्याचा दावा देखील केला.  तसेच जाहिरातीमध्ये (Fake Advertisment) असे म्हटले आहे की, उत्पादने खरेदी करणाऱ्यांना क्रिकेटपटूंचा  ऑटोग्राफ केलेला टी-शर्ट देखील मिळणार आहे. 


सचिन तेंडुलकरटे ट्वीट :






 पोलिसांनी (Police) आरोपींवर आयपीसी आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या संबंधित कलमांतर्गत फसवणूक, बनावटगिरी आणि मानहानीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी या प्रकरणात अज्ञात  व्यक्तींविरोधात एफआयआर (FIR) नोंदवला आहे.  आयपीसीच्या कलम 420 , 465 आणि 500 अंतर्गत  प्राथमिक तक्रार नोंदवण्यात आली आहे. या प्रकरणात पुढील तपास सुरु आहे.


हे ही वाचा :


Sachin Tendulkar : साराच्या हाती जळण, सचिनच्या हाती फुकणी, अंजलीची फोडणी, तेंडुलकरांचा गावरान गोडवा