मुंबई : राष्ट्रवादी शरद पवार (Sharad Pawar) गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांना ईडीची (ED) नोटीस बजावण्यात आलीये. दरम्यान रोहित पवार यांना बुधवार 24 जानेवारी रोजी चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे. आआधी देखील केंद्रीय यंत्रणांकडून रोहित पवारांना वेगवेगळ्या प्रकरणात नोटीस बजावण्यात आली होती. तसेच नुकतचं त्यांच्या बारामती अॅग्रोशी संबंधित कारखान्यांवर ईडीचे छापे पडले होते. त्यानंतर आता रोहित पवार यांनी ईडीची नोटीस बजावण्यात आलीये. 


दरम्यान मागील अनेक दिवसांपासून रोहित पवारांच्या घरी ईडीची छापेमारी सुरु होती. पण त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले नव्हते. तसेच मी ज्याप्रकारे वेगवेगळ्या मुद्द्यांवर भाष्य करतोय, त्यामुळे माझ्यावर केंद्रीय यंत्रणांचा दबाब आणण्याचा प्रयत्न सुरु असल्याचं रोहित पवारांकडून वारंवार सांगण्यात येत होतं. त्यामुळे आता या सगळ्या घडामोडींवर रोहित पवार काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तसेच यानंतर रोहित पवार चौकशीला हजर राहणार हे पाहणं देखील गरजेचं ठरेल. 


बारामती अॅग्रोवर ईडीची छापेमारी


बारमती अॅग्रो कथित गैरव्यावहार प्रकरणी मुंबईसह सहा ठिकाणी ईडीने छापेमारी कोली होती. आमदार रोहित पवार यांची ही  बारमती अॅग्रो कंपनी आहे. बारामती अॅग्रोच्या सहा कार्यालयावर ईडीकडून तपास करण्यात आला. मागील वर्षी याच संदर्भात रोहित पवारांना नोटीस बजावण्यात आली होती. आता त्यांच्या कंपनीवर छापेमारी करण्यात आलीये. 


रोहित पवारांना याआधी देखील नोटीस आली होती - शरद पवार


दरम्यान रोहित पवारांना ईडीची नोटीस बजावल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रतिक्रिया समोर आलीये. रोहित पवार यांना आधी देखील नोटीस आली होती, असं म्हणत शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली. 


किशोरी पेडणेकर यांनाही ईडीचं समन्स 


ठाकरे गटाच्या नेत्या आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना देखील ईडीकडून समन्स बजावण्यात आलं आहे. कथित बॉडी बॅग घोटाळ्याप्रकणी किशोरी पेडणेकर यांना हे समन्स बजावण्यात आलंय. दरम्यान किशोरी पेडणेकर यांना 25 जानेवारी रोजी चौकशीला हजर राहण्याचे आदेश दिलेत. त्यामुळे किशोरी पेडणेकर या चौकशीला हजर राहणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. 


शुक्रवार 19 जानेवारी रोजी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांना देखील ईडीकडून समन्स बजावण्यात आलं होतं. त्यातच आता किशोरी पेडणेकर यांना देखील समन्स बजावण्यात आलंय. मागील अनेक दिवसांपासून याचसंदर्भात किशोरी पेडणेकर यांची चौकशी देखील सुरु होती. त्यामुळे आता यावर किशोरी पेडणेकर या काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 


हेही वाचा : 


Shard Pawar : श्रीरामाबद्दल सर्वांच्या मनात आदर, पण निवडणुकांसाठी रामाच्या नावाचा वापर केला जातोय, सोलापुरात शरद पवारांचा घणाघात