सोलापूर : सोलापुरातील (Solapur) कार्यक्रमादरम्यान शरद पवारांनी (Sharad Pawar) केंद्र सरकारवर निशाणा साधला. निवडणुकांसाठी रामाच्या नावाचा वापर केला जातोय. श्रीराम यांच्याबद्दल सगळ्यांच्या मनात आदर आहे. मात्र या राज्यकर्त्यांना त्याबद्दल महत्व वाटत नाही. तरुणांच्या हाताला रोजगार नाही, महागाई वाढली आहे, महिलांचे प्रश्न कायम आहेत, असं शरद पवारांनी म्हटलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शुक्रवार 19 जानेवारी रोजी सोलापूरच्या दौऱ्यावर होते. त्याच दिवशी शरद पवार यांचा देखील सोलापूर दौरा नियोजित होता. दरम्यान शरद पवार यांनी त्यांच्या या दौऱ्यादरम्यान राम मंदिराच्या (Ram Mandir) उद्घाटनावरुन सरकारवर निशाणा साधला. त्यांच्या भूमिकेपेक्षा वेगळं मत दिलं की रामाला विरोध करतात, असं ते म्हणतात. जेव्हा राममंदिरासाठी समिती स्थापन करण्यात आली त्याचं अध्यक्ष शरद पवार आणि बाबरी मशीदचे अध्यक्ष अध्यक्ष भैरावसिंह शेखावत होते, असं म्हणत शरद पवारांनी मोदी सरकारवर निशाणा साधला.
मंदिर वही बनाऍंगे म्हणणाऱ्यांनी भूमिका बदलली - शरद पवार
राम मंदिराचा प्रश्न खूप जुना आहे. हिंदू-मुस्लिम वाद होता तेव्हा केंद्रात काँग्रेसचं सरकार होतं. या वादावर तोडगा काढण्यासाठी दोन कमिट्या नेमल्या होत्या. राम जन्मभूमी न्यास या कमिटीचा मी अध्यक्ष होतो. तेव्हा राम मंदिराच्या कुलूपाची चावी राजीव गांधी यांनी खोलली. बाबरी मशीद पाडली त्याठिकाणी राम मंदिर बांधव ही भूमिका तेव्हा मांडण्यात आली. दोन वर्षांपूर्वी निकाल लागला. आज जी मूर्ती ठेवण्यात आली आहे ती मूळ ठिकाणापासून बाजूला बसवली. त्यामुळे मंदिर वही बनाऍंगे म्हणणाऱ्यांनीच भूमिका बदलली असल्याचं शरद पवारांनी म्हटलं.
जेव्हा मंदिर पूर्ण होईल तेव्हा मी जाईन - शरद पवार
मी अयोध्येच्या दौऱ्यावर जाणार आहे. जेव्हा मंदिर पूर्णपणे बांधून तयारी होईल तेव्हा मी रामाचं दर्शन घेण्यासाठी जाणार असल्याचं आधीच सांगितलंय. ही मूर्ती देखील जिथे होती त्याच्यापासून दूर बसवण्यात आलीये. आम्हालाही निमंत्रण आलंय, रामाबद्दल आम्हालाही आदर आहे. पण हा कार्यक्रम विशिष्ट धर्म आणि विशिष्ट लोकांचा असल्याचं चित्र सध्या उभं केलं जातंय, असं शरद पवार म्हणालेत.
दुष्काळासाठी मदत दिली जात नाही - शरद पवार
अयोध्ये उभारण्यात येणाऱ्या भव्य श्रीराम मंदिराच्या खर्चावरुन देखील शरद पवारांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. यावेळी त्यांनी म्हटलं की, अयोध्येत 7 हजार कोटी खर्च केला जातोय. एकाबाजूला दुष्काळाग्रस्तांना मदत दिली जात नाही. येणाऱ्या निवडणुकांमध्ये रामाच्या नावाचा वापर केला जातोय. सध्याचे राज्यकर्ते देशाला वेगळ्या वळणावर घेऊन जात असून सत्तेचा गैरवापर करातायत.