वसई: सोसायटी किंवा इमारतीच्या प्रांगणात खेळणारी आपली मुलं नेमकी कुठं आहेत? ती सुरक्षित ठिकाणी खेळतायत का, यावर पालकांनी नजर ठेवण्याची गरज आहे. वसई पश्चिमेच्या (Vasai News) गायत्री मंदिराजवळ सोमवारी रात्री लपाछपी खेळताना एका 14 वर्षांच्या मुलाच्या दंडातून रॉड घुसल्याची खळबळजनक घटना घडली. सोमेध जाधव असं त्याचं नाव आहे. तो सध्या नववीत आहे.
वसईत लपाछपी खेळताना ग्रीलच्या वरील रॉड एका लहानग्याच्या शोल्डरच्या खालील हातात शिरला आहे. लोखंडी गेटवरून पलीकडे उडी मारण्याच्या प्रयत्नात सोमेधचा हातात बाणाच्या आकृतीचा रॉड घुसला आणि तो तिथंच अडकून पडला. वसई पश्चिमेच्या गायत्री मंदिर जवळ सोमवारी रात्री 8 च्या दरम्यान काही मुले लपाछपी खेळत होता. लपाछपी खेळताना सोमेध तेथील लोखंडाच्या गेटवर चढला आणि दुस-या बाजूला उतरत असताना त्यानं उडी मारण्याचा प्रयत्न केला. मात्र पाय सटकला आणि तो लोखंडी सळईवर पडला.
सहा इंच रॉड हातात घुसला
सुमेध ज्या सळईवर पडला तो लोखंडी रॉड बाणाच्या आकाराचा होता. सहा इंच तो रॉड हातात घुसलण्याने सोमेध तेथेच अडकून राहिला. परिसरातील नागरीकांनी लोखंड कापण्याच्या मशिनने तो रॉड कापून, जवळच्या रुग्णालयात त्याला नेलं. तिथं डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून त्याच्या दंडातला रॉड काढण्यात यश मिळवलं. त्यामुळं सोमेध जाधवची प्रकृती आता स्थिर आहे.
पालकांनो काळजी घ्या!
शहरांमध्ये इमारतीच्या टेरेसवर मुलांचं खेळणं काही नवीन नाही. मोठ्या संख्येनं मुलं या ठिकाणी खेळताना आपणाला सर्रास दिसून येतात. त्यामुळं पालक देखील निश्चिंत असतात. असं असलं तरी पालकांनी आता अधिक सतर्क होण्याची आणि मुलांकडे लक्ष देण्याची गरज आहे. या घटनेमुळं पालकांनी देखील मुलांच्याबाबत अधिक सतर्क होणं गरजेचं आहे. आपली मुलं कुठं काय करतात? त्यांच्या हालचालींकडे अधिक लक्ष असणं, त्यांच्याबाबत अधिक सतर्क होणं गरजेचं आहे हे नक्की!
हे ही वाचा :