Celebrities Update: प्रसिद्ध कोरिओग्राफर आणि चित्रपट दिग्दर्शक रेमो डिसूझा यांचा मेहुणा जेसन सावीओ वातकिन्स याने आत्महत्या केली आहे. 48 वर्षीय जेसन सावीओ वातकिन्स याच्या आत्महत्याप्रकरणी ओशिवारा पोलीस स्थानकात ADR  दाखल करण्यात आला आहे. रेमो डिसूझा आणि पत्नी लिझेल डिसूझा यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. जेसन सावीओ वातकिन्स याचा मृतदेह मुंबईतील घरामध्ये मृतावस्थेत आढळून आला.  पोस्ट मार्टमसाठी जेसन सावीओ वातकिन्स याचा मृतदेह कूपर रुग्णालयात नेहण्यात आला आहे. आत्महत्याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, जेसन सावीओ वातकिन्स याला गांजाचे व्यसन लागले होते, यामध्येच त्याने आत्महत्या केली. जेसन   दीर्घकाळ चित्रपटसृष्टीशी संबंधित होते. रेमो डिसूझासोबत सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले.


या प्रकरणी पोलिसांनी मृतकाचे 74 वडील डेसमंड सिरिल डंसटन आणि बहिण लिझिली रेमो डिसूजा यांची चौकशी केली. यामध्ये पोलिसांनी समजले की, तीन वर्षांपूर्वी जेसन सावीओ वातकिन्स याच्या आईचे निधन झाले होते. तेव्हापासून जेसन सावीओ वातकिन्स डिप्रेशनमध्ये गेला होता. यामध्ये त्याला गांजाचे व्यसन लागले होते. मिळालेल्या माहितीनुसार, जेसन सावीओ वातकिन्स याने गुरुवारी सकाळी आत्महत्या केली. दुपारी १२ वाजता पोलीस स्टेशनमध्ये जेसन सावीओ वातकिन्स याने आत्महत्या केल्याचा फोन आला होता. यमुना नगर येथील फ्लॅट क्रमांक 302 मध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली.  




लिझेल डिसूझाने भावाचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये भावाचा फोटो पोस्ट केलाय. ‘का…? तू माझ्याशी हे कसे करू शकतोस? मी तुला कधीच माफ करणार नाही, असे लिझेलने पोस्टमध्ये म्हटलेय. लिझेलने तिचा आणि भावाचा बालपणीचा एक फोटोही सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. तिसरा फोटो शेअर करून लिझेलने तिच्या आईची माफीही मागितली आहे.


मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live