Parambir singh related extortion case : परमबीर सिंह यांच्यासह फरार घोषित करण्यात आलेल्या सहआरोपीला अखेर मुंबई सत्र न्यायालयानं जामीन मंजूर केला आहे. विनय सिंह असं याचं नाव असून त्याला 30 हजार रूपयांच्या जातमुचलक्यावर सोडण्याचे निर्देश देताना याप्रकरणी आरोपपत्र दाखल होईपर्यंत दर सोमवारी सकाळी 10 ते दुपारी 12 यावेळेत स्थानिक पोलीस स्थानकांत हजेरी लावण्याची अट घालण्यात आली आहे. या प्रकरणातील अन्य आरोपी रियाझ भाटीसह व विनय सिंह यालाही फरार आरोपी घोषित केल्याचा आदेश हायकोर्टानं रद्द केला होता. गोरेगाव पोलीस स्टेशनमध्ये यासर्वांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल आहे. 


खंडणी प्रकरणी मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात परमबीर सिंह, रियाज भाटी आणि विनय सिंह यांना आरोपी दाखवण्यात आलं आहे. रियाझ भाटीवर आयपीसी कलम 384, 385, 388, 388, 120 ब आणि 34 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला असून हा तपास नंतर सीआयडीकडे हस्तांतरित करण्यात आला आहे.


विनय सिंह यांच्यातर्फे अैड. अनिकेत निकम यांनी युक्तिवाद केला. या तक्रारीत काहीही तथ्य नसून मूळ तक्रारदाराविरोधात ठाण्यात काही ठिकाणी खंडणीवसुलीचे गुन्हे दाखल आहेत. याचिकाकर्ता हा परमबीर सिंह आणि सचिन वाझे यांच्यासाठी वसुलीचं काम करत असल्याचा पोलिसांचा आरोप असला तरी याचिकाकर्त्यानं वाझे किंवा सिंह यांना कधीही संपर्क केलेला नाही. तसेच मुख्य आरोपी परमबीर सिंह यांना सर्वोच्च न्यायालयानं अटकेपासून संरक्षण दिलेलं आहे. मग इतर आरोपींना जामीन देण्यास काय हरकत आहे?, असा सवाल त्यांनी कोर्टात उपस्थित केला होता.


महत्वाच्या बातम्या :


Anil Deshmukh Money Laundering Case : अनिल देशमुख यांच्या न्यायलयीन कोठडीत आणखी 14 दिवसांची वाढ
कथित 100 कोटी वसूली प्रकरण; CBI ने सात पोलिसांचा जबाब नोंदवला


मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live