Reliance Jio 5G : देशातील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी Jio ने सुमारे 1,000 शहरांमध्ये 5G सेवा सुरू करण्याची तयारी पूर्ण केली आहे. कंपनीने स्वदेशी विकसित 5G दूरसंचार उपकरणांची चाचणी देखील केली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने  (RIL) आपल्या वार्षिक अहवालात म्हटले आहे की, त्यांची दूरसंचार कंपनी जिओने आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये 100% स्वदेशी तंत्रज्ञानासह 5G सेवांसाठी स्वतःला तयार केले आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, जिओ सुरुवातीला देशातील प्रमुख 9 शहरात 5जी सेवा सुरु करणार आहे. यात मुंबई, नवी मुंबई, अहमदाबाद, जामनगर, लखनऊसारख्या प्रमुख शहरांचा समावेश आहे. जिओकडून ऑगमेंटेड रिअ‍ॅलिटी, व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटी, लो-लेटन्सी क्लाउड गेमिंग, टीव्ही स्ट्रीमिंग, कनेक्टेड हॉस्पिटल्स आणि इंडस्ट्रियल अॅप्लिकेशन्ससाठी 5जी वापरासाठी चाचण्या करण्यात आल्या आहेत. कंपनी 5जी करीता स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करणार आहे. याच दरम्यान, फिनलॅंडमधील विद्यापीठासोबत जिओकडून 6जी साठी सर्वेक्षणास सुरुवात करण्यात आल्याचं सांगण्यात येतं आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजकडून जाहीर केलेल्या वार्षिक अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. कंपनीची वार्षिक सर्वसाधारण सभा 29 ऑगस्ट रोजी होणार आहे.


तत्पूर्वी रिलायन्स इन्फोकॉमचे चेअरमन आकाश अंबानी म्हणाले होते की, संपूर्ण भारतात 5G मोबाइल सेवा सुरू केल्याने आझादीचा अमृत महोत्सव साजरा केला जाणार आहे. रिलायन्स जिओ जागतिक दर्जाची  परवडणारी 5G ची  सेवा देणार आहे. जी शिक्षण, आरोग्य, कृषी, उत्पादन आणि ई-गव्हर्नन्स क्षेत्रातील डिजिटल क्रांतीला गती देण्यासाठी काम करेल. रिलायन्स जिओने आपल्या निवेदनात म्हटले होते की, जिओ कमीत कमी कालावधीत 5G मोबाइल सेवा आणणार आहे. दरम्यान, 1  ऑगस्ट रोजी 5 जी स्पेक्ट्रमचा लिलाव संपला. 5 जी स्पेक्ट्रमच्या लिलावातून केंद्र सरकारला तब्बल दीड लाख कोटी रूपयांचा महसूल मिळला आहे. 40 व्या फेरीनंतर 5 जी स्पेक्ट्रमचा लिलाव संपला. एअरटेल आणि जिओ या दूरसंचार कंपन्या आता संपूर्ण देशभर 5 जीचे जाळे पसरवणार आहेत. सात दिवस हा लिलाव चालला होता.


महत्वाच्या बातम्या :