Mumbai News Update : गेल्या काली दिवसांपासून मुंबईत स्वाईन फ्लूच्या (Swine Flu) रुग्णांची संख्या वाढत आहे. 2021 च्या तुलनेत यंदा स्वाईन फ्लूची रुग्णसंख्या तीन पटीने वाढली आहे. मागील सात दिवसांत स्वाईन फ्लूचे 80 रुग्ण आढळले आहेत. तर जुलैपासून आतापर्यंत 185 रुग्ण आहेत. जुलै महिन्यात 105 जणांना स्वाईन फ्लूची लागण झाली होती.
पावसाळ्यात डेंग्यू, मलेरिया, लेप्टो या आजारांच्या रुग्णांची संख्या वाढते. परंतु, जून महिण्यापासून मुंबईत स्वाईन फ्लूचे रूग्ण आढळत आहेत. 1 जून ते 7 ऑगस्टपर्यंत मुंबईत 189 स्वाईन फ्लूचे रुग्ण आढळून आले आहेत. 2021 च्या तुनेत ही संख्या तीन पटीने जास्त आहे. 2021 ला मुंबईत स्वाईन फ्लूचे 64 रूग्ण आढळले होते.
मुंबईत वाढत्या स्वाइन फ्लूच्या रुग्णांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, अनेकजण सर्दी, तापाने त्रस्त होताच रुग्णालयाच्या फेऱ्या मारत आहेत. बहुतेक लोक सर्दी आणि ताप यासारख्या संसर्गाने त्रस्त आहेत. लहान मुलांमध्ये हात, पाय आणि तोंडाचे आजारही समोर येत आहेत.
गॅस्ट्रो आणि मलेरीयाच्या रुग्णसंख्येत वाढ
स्वाईन फ्लूसह मुंबईत गॅस्ट्रो आणि मलेरीयाच्या रुग्णसंख्येत देखील वाढ होत आहे. मागील सात दिवसात मुंबईत गॅस्ट्रोचे 119 रुग्ण आढळे असून 1 जूनपासून 7 ऑगस्टपर्यंत गॅस्ट्रोचे 3 हजार 704 रूग्ण आढळून आले आहेत.
मलेरीयाचे 218 रूग्ण
मुंबईत मागील काही दिवसांपासून मलेरीयाचे 218 रूग्ण आढळून आले आहेत. वाढती रूग्णसंख्या लक्षात घेता आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. स्वाईन फ्लूच्या रूग्णांमध्ये ताप, सर्दी, खोकला, थ्रोट इन्फेक्शन, अंगदुखी, डोकेदुखी, उलटी आणि डायरीयासारखी लक्षणे दिसत आहेत.
महत्वाच्या बातम्या