Ramdas Athawale on Uddhav Thackeray : उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे, अशी कवितेतून टीका केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी शिवसेना ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज महायुतीच्या उमेदवारांसाठी शिवाजी पार्क (Shivaji Park) येथे सभा घेत आहेत. या सभेतून रामदास आठवले यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.
रामदास आठवले म्हणाले की, काँग्रेस, राष्ट्रवादीचा आयुष्यभर विरोध करत आले बाळासाहेब ठाकरे, मग तुम्ही त्यांच्याकडे का गेलात उद्धव ठाकरे? या महाराष्ट्रात देशात निवडणुकीचा उत्सव आज साजरा करत आहोत. या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी मजबूत आहेत. राज्यात एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, राज ठाकरे आणि आम्ही सर्वजण मजबूत आहोत.
उद्धव ठाकरेंवर कवितेतून टीका
तुम्हाला जे बोलायचे असेल ते उद्धवजी बोला. पण चार तारखेला आम्हीच तुम्हाला देणार आहोत जबरदस्त टोला. उद्धव ठाकरेजी आता आपले महाराष्ट्रात चालणार नखरे, कारण आमच्या सोबत आलेले आहेत राज ठाकरे, असा टोला त्यांनी यावेळी उद्धव ठाकरेंना कवितेतून लगावला आहे.
मुंबईला तोडण्याचा कुणाचाही डाव नाही
ते पुढे म्हणाले की, या मुंबईला नरेंद्र मोदी यांनी भरपूर निधी दिलेला आहे. अजूनही मुंबईच्या विकासासाठी हजारो कोटी रुपये मिळणार आहेत. मुंबईला तोडण्याचा कुणाचाही डाव नाही. मुंबई ही महाराष्ट्राची आहे. मुंबईला कुणी तोडण्याचा प्रयत्न केला तर आम्ही त्यांना झोडून टाकल्याशिवाय राहणार नाही. निवडणुका आल्या की मुंबई तोडणार आहे. बाळासाहेब आंबेडकरांचे संविधान धोक्यात आहे. संविधान धोक्यात नाही तर तुम्ही महाविकास आघाडीसोबत तुम्ही खोक्यात आहात अशी टीका त्यांनी यावेळी केली.
इतर महत्वाच्या बातम्या
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर पहिल्या 100 दिवसात काय करणार? मोठा प्लॅन समोर