Lok Sabha Election MVA & Mahyuti Rally LIVE: महायुती Vs महाविकास आघाडी, हायव्होल्टेज सभा, बड्या नेत्यांच्या तोफा धडाडणार

Maharashtra Politics: राज्यात लोकसभा निवडणुकीचा शेवटच्या टप्प्यातील प्रचार. बड्या नेत्यांच्या राज्यातील शेवटच्या सभा. मुंबईत महायुती आणि महाविकास आघाडीचा हायव्होल्टेज सामना.

रोहित धामणस्कर Last Updated: 17 May 2024 08:06 PM

पार्श्वभूमी

मुंबई: राज्यात येत्या 20 मे रोजी लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या आणि अंतिम टप्प्यातील मतदान होत आहे. आतापर्यंतच्या चार टप्प्यांमध्ये महाविकास आघाडी (MVA Rally) आणि महायुतीमध्ये (Mahayuti) प्रचंड चुरस पाहायला मिळाली. चौथ्या...More

राज ठाकरेंच्या मोदींकडून 5 मागण्या, भरसभेत व्यक्त केल्या अपेक्षा

पुढच्या पाच वर्षांसाठी मोदीजींसमोर उभा आहे. महाराष्ट्राच्या खूप अपेक्षा आहेत. त्यातील काही गोष्टी सांगत आहे. अनेक वर्षे खितपत पडलेला मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा. देशाच्या अभ्यासक्रमामध्ये 125 वर्षे मराठा सामज्र होतं, त्याचा इतिहास शालेय शिक्षणामध्ये असावा. भविष्यातील पिढ्यांना याबाबत माहिती मिळेल. समुद्रामध्ये छत्रपतींचा पुतळा कधी उभा राहिल माहित नाही. पण शिवछत्रपतींची खरी स्मारके आहेत ती म्हणजे गड किल्ले आहेत.  गडकिल्ल्यांना गतवैभव मिळावं यासाठी आंतरराष्ट्रीय समिती स्थापन करावी. भविष्यातील पिढ्यांना आमचा राजा कोण होता.त्यानं काय इतिहास गाजवला हे त्या गडकिल्ल्यावरुन कळेल, असे मनसे प्रमुख राज ठाकरे म्हणाले.