मुंबई : हार्बर रेल्वे मार्गावर असलेल्या टिळक नगर रेल्वे स्थानकात कर्तव्यावर (ड्युटीवर) असलेल्या महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या जवानाला अब्दुल अजीज अन्सारी या इसमाने त्याच्या मित्रमंडळी आणि भावाच्या सहाय्याने बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. शंकर मनोहर आव्हाड असे मारहाण झालेल्या जवानाचे नाव असून मारहाणीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. शंकर आव्हाड यांनी अन्सारीला रेल्वे स्थानकासमोरच्या नो पार्किंगमध्ये गाडी पार्क करण्यास विरोध केला यामुळे अन्सारीने आव्हाड यांना मारहाण केली.
अब्दुल अन्सारी हा रेल्वे कर्मचारी आहे. 17 मे रोजी तो त्याच्या पत्नीला टिळक नगर रेल्वे स्थानकात सोडण्यासाठी आला होता. यावेळी त्याने त्याची दुचाकी रेल्वे स्थानकसमोरील नो पार्किंग विभागात उभी केली. त्यामुळे त्याला तिथे कर्तव्यावर असलेल्या एमएसएफचे जवान शंकर आव्हाड यांनी गाडी उभी करण्यास मनाई केली. यावर आपण रेल्वेचे कर्मचारी असून अन्सारी आव्हाड यांना धमकावू लागला.
अन्सारीच्या धमकीनंतरही आव्हाड यांनी येथे गाडी लावण्यास मनाई असल्याचे सांगितले. त्यामुळे अन्सारी याने त्याचे नातेवाईक आणि मित्रमंडळीना फोन करुन त्या ठिकाणी बोलावले. त्यानंतर मित्र आणि भावाच्या सहाय्याने अन्सारीने शंकर आव्हाड यांना बेदम मारहाण केली.
मारहाणीची संपूर्ण घटना टिळक नगर रेल्वे स्थानकाच्या सीसीटीव्हीत कैद झाली आहे. याप्रकरणी नेहरुनगर पोलिसांनी अब्दुल अन्सारीसह त्याचा भाऊ इरफान अन्सारीला बेड्या ठोकल्या आहेत. अन्सारीची मदत करुन आव्हाड यांना मारहाण करणाऱ्या इतर आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.
टिळक नगर रेल्वे स्थानकात महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या जवानाला बेदम मारहाण
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
19 May 2019 10:04 PM (IST)
हार्बर रेल्वे मार्गावर असलेल्या टिळक नगर रेल्वे स्थानकात कर्तव्यावर (ड्युटीवर) असलेल्या महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या जवानाला अब्दुल अजीज अन्सारी या इसमाने त्याच्या मित्रमंडळी आणि भावाच्या सहाय्याने बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -