Prithvi Shaw Selfie Controversy : क्रिकेटपटू पृथ्वी शॉ याच्यावरील हल्ल्याप्रकरणी सपना गिल चर्चेत आली होती. याप्रकरणी सपना गिलसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी या आरोपींना आज कोर्टात हजर केले होते. कोर्टाकडून यांना आधी 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. पण त्यानंतर कोर्टानं त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. पृथ्वी शॉ याचा मित्र आशीष यादव यानं याप्रकरणी ओशिवारा पोलिसात सपना गिलसह सात जणांविरोधात गुन्हा दाखल केला होता. 


ओशिवरा पोलिसांनी सपना गिल हिच्यासह चार आरोपींना आज न्यायालयात हजर केले.  चारही आरोपींना न्यायालयाने आधी  14 न्यायालयीन कोठडी सुनावली होती. सपना गिलने लगेच जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला होता. न्यायालयाने सपना गिलसह सर्व आरोपींना जामीन मंजूर केला आहे. दरम्यान, कोणत्याही मौल्यवान वस्तूंची डिलिव्हरी नसल्यामुळे IPC चे 384 कलम लागू नाही होत. आयपीसीचे कलम 387 लागू होत नाही कारण FIR मध्ये पृथ्वी किंवा कोणालाही मृत्यू किंवा जीवाला धोका असल्याचा उल्लेख नाही, असा युक्तीवाद झाला. 


Prithvi Shaw Sapna Gill Selfie Case Update : पृथ्वी शॉ - सपना गिल सेल्फी प्रकरण


भारतीय क्रिकेटपटू पृथ्वी शॉ सध्या टीम इंडियाबाहेर आहे. अभिनेत्री सपना गिलसोबतच्या वादामुळे पृथ्वी शॉ चर्चेत आहे. मुंबईच्या रस्त्यावर दोघांमध्ये बाचाबाची झाली. सपना गिलने पृथ्वीच्या मित्राच्या गाडीच्या काचा फोडल्या असा आरोप आहे. त्यानंतर अभिनेत्री सपना गिलला पोलिसांनी अटक केली आहे. सपना गिल कोण आहे तिचं करिअर आणि वैयक्तिक आयुष्याबाबत माहित नसलेल्या गोष्टी जाणून घ्या.


Who is Sapna Gill : कोण आहे सपना गिल?


सपना गिल भोजपुरी अभिनेत्री आणि मॉडेल आहे. सपना तिचं ग्लॅमर आणि अभिनयाच्या जोरावर भोजपुरी इंडस्ट्रीमध्ये हळूहळू आपली छाप पाडण्याचा प्रयत्न करत आहे. सपना गिल सध्या 26 वर्षांची आहे. सपनाचा जन्म पंजाबची राजधानी चंदीगड येथे झाला. सपनाने 'काशी अमरनाथ' आणि 'निरहुआ चलल लंदन' या चित्रपटांमध्ये भोजपुरी सुपरस्टार अभिनेता रवि किशन आणि दिनेश लाल यादव 'निरहुआ' यांच्यासोबत चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तिच्या अद्याप एवढी प्रसिद्धी मिळाली नसली. तरी पृथ्वी शॉसोबतच्या वादामुळे सपना गिल चर्चेत आली आहे.


Prithvi Shaw Sapna Gill Selfie Case : काय आहे प्रकरण?


भारतीय क्रिकेटर पृथ्वी शॉ याचा एका तरुणीसोबत वाद झाला. मुंबईतील हॉटेल बाहेर ही घटना घडली. सेल्फी घेण्यावरुन हा वाद झाला असल्याचं समोर आलं. पृथ्वी शॉसोबत सेल्फी काढताना हाणामारी झाल्याचं यात सांगण्यात येत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, ही घटना जोगेश्वरी लिंक रोड येथील लोटसच्या पेट्रोल पंपाजवळ घडल्याची माहिती आहे. पृथ्वी शॉच्या मित्राने दिलेल्या माहितीनुसार, पृथ्वी शॉ याचा एका हॉटेलात पार्टी सुरु असताना सेल्फी काढण्यावरुन वाद झाला. त्यानंतर हॉटेलमधून शॉ दुसऱ्या कारने घराकडे निघाला होता. त्यादरम्यान त्याच्या मित्राच्या कारमध्ये तो असल्याचं संबधितांना वाटलं आणि तरुणी आणि तिच्या मित्रांनी त्या कारवर हल्ला केला.


आणखी वाचा :


VIDEO : पृथ्वी शॉसोबत सेल्फी घेण्यावरून वाद, भररस्त्यात पृथ्वीची मुलीसोबत बाचाबाची, वाचा संपूर्ण प्रकरण