Prithvi Akash Ambani Birthday : मुंबई : देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले मुकेश अंबानी (mukesh ambani) आपल्या नातवाचा वाढदिवस मोठ्या धुमधडाक्यात साजरा करण्याची तयारी करत आहेत. या वाढदिवसासाठी देशभरातून सेलिब्रिटी हजेरी लावणार आहेत. शिवाय बड्डेबॉयला आशीर्वाद देण्यासाठी तब्बल शंभर पुजारी उपस्थित राहणार आहेत. वाढदिवच्या निमित्ताने अंबानी कुटंबीय (mukesh family) जवळपास 50 हजार लोकांना अन्नदान करणार असून शेकडो लोकांना भेटवस्तू वाटण्यात येणार आहेत. 


मुकेश अंबानी यांचे पुत्र आकाश (akash ambani) आणि श्लोका यांच्या पृथ्वी (prithvi ambani) या मुलाचा 10  डिसेंबर रोजी पहिला वाढदिवस आहे. या वाढदिवसाच्या निमित्ताने अंबानी कुटुंबीयांनी जोरात तयारी केली आहे. या वाढदिवसाला उस्थित राहणाऱ्या लोकांचे कोरोना लसीचे दोन्ही डोस झाले आहेत का? यासह कोरोना नियमांचे काटेकोर पालन करण्यात येणार आहे. याचाच एक भाग म्हणून ज्या सेलिब्रिटींना वाढदिवसाचे आंमत्रण देण्यात आले आहे त्यांची आतापासूनच रोज कोरोना तपासणी होणार आहे. अंबानी परिवाराचे डॉक्टर या सेलिब्रिटींच्या आरोग्याचा रोजचा अहवाल तयार करतील. सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर अंबानी यांच्या खासगी विमानाने या सर्वांना जमानगर येथील वाढदिसाच्या स्थळी आणले जाईल. शिवाय वाढदिवसापर्यंत प्रत्येकाला अलगीकरणात ठेण्यात येईल. 


हे सेलेब्रिटी लावणार हजेरी
अंबानी कुटुंबीयांच्या नातूचा वाढदिवस म्हटल्यानंतर सेलिब्रिटी लोकांची उपस्थिती तर राहणारच. या वाढदिवसाला अभिनेता रणबीर कपूर (ranbir kapoor), अभिनेत्री आलिया भट (alia bhatt), दीपिका पदुकोण (deepika padukone), रणबीर सिंह (ranveer singh), पार्थ जिंदाल माजी क्रिकेटपट्टू सचिन तेंडूलकर, जहिर खान आपल्या परिवारांसोबत उपस्थित राहणार आहेत. तर प्रसिद्ध गायक अर्जित सिंह आपल्या गाण्यांनी कार्यक्रमात रंगत आणेल. 


हजारो गावांना अन्नदान होणार 
वाढदिवसाच्या आधी अंबानी कुटंब हजारो गावातील जवळपास 50 हजार लोकांना अन्नदान करणार आहेत. शिवाय अनाथ आश्रमातील मुलांना पृथ्वीकडून भेटवस्तू पाठविण्यात येणार आहेत. वाढदिवसाच्या निमित्ताने श्लोका अंबानी यांनी पृथ्वीसाठी नेदरलँडवरून खास खेळणी मागविली आहेत.  


शंभरपेक्षा जास्त पुजारी देणार आशीर्वाद
 पृथ्वीच्या वाढदिवसासाठी शंभरपेक्षा जास्त पुजाऱ्यांना आंत्रण देण्यात आले आहे. वाढदिवसस्थळी हे सर्व पुजारी पृथ्वीच्या आरोग्य आणि दीर्घायुष्यासाठी पूजा करतील. त्यानंतर पृथ्वीला आशीर्वाद देतील.  


कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी अशी घेतली जाणार काळजी! 
कोरोना आणि अलीकडेच पसरत असलेल्या ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कार्यक्रमात विशेष खबरदारी घेण्यात येणार आहे. सरकारी नियमांचे पालन करण्यात येणार आहे. याच पार्श्वभूमीवर कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या लोकांच्या जेवणाची व्यवस्था वेगळी करण्यात आली आहे. पाहुण्यांचे जेवण बनविणारे  खास आचारी इटलीहून येणार आहेत. हे आचारी भारतात आल्यानंतर त्यांची रोजच्या रोज कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. शिवाय त्यांना अलगीकरणात ठेवण्यात येणार आहे. त्यांचे अहवाल निगेटिव्ह आले तरच त्यांना जेवण बनवण्याची परवानगी देण्यात येणार आहे.  


इतर महत्वाच्या बातम्या 


Isha Ambani House Pics: ईशा अंबानी आणि आनंद पिरामल यांचा बंगला पाहून तुम्ही व्हाल आश्चर्यचकित, डायमंड कट इंटीरियरपासून


Mukesh Ambani : मुकेश अंबानी लंडनमध्ये स्थायिक होणार? रिलायन्स समूहाने दिली 'ही' माहिती