मुंबई: प्रीती राठीवर झालेल्या अॅसिड हल्ल्याप्रकरणी आरोपी अंकुर पनवारला कोर्टाने दोषी ठरवलं आहे. मुंबई सत्र न्यायालयाने अंकुर पनवारवरला हत्या आणि अॅसिड हल्ल्याप्रकरणी दोषी ठरवलं. त्याला आता शिक्षा सुनावण्यात येईल.
काय आहे प्रकरण?
मे 2013 मध्ये नोकरीनिमित्त मुंबईत आलेल्या प्रीती राठीवर वांद्रे टर्मिनसवर दिल्लीतला तिचा शेजारी अंकुर पनवारनं अॅसिड हल्ला केला होता. कुलाब्यातील मेडिकल कॉलेजमधील लेफ्टनंट पदासाठी देशभरातून १५ जणींची निवड झाली होती; त्यात प्रीतीचा समावेश होता.
प्रीती 2 मे रोजी वडील आणि नातेवाईकांसह गरीब रथ एक्स्प्रेसनं मुंबईत आली होती, तेव्हा वांद्रे टर्मिनसवर अंकुर पनवारनं, पूर्वीचा राग मनात ठेवून तिचा मुंबईपर्यंत पाठलाग केला. त्यानंतर वांद्रे टर्मिनसवर तिच्यावर अॅसिड हल्ला केला होता.
हल्ल्यात तिचे वडील, मावशी, काका आणि अन्य दोन प्रवासीही जखमी झाले होते. तर या अॅसिड हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या प्रीतीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता.