मुंबई : जरांगे पाटील यांना सांगितलं होतं राजकीय भाष्य करु नका. देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करु नका. त्यामुळे त्यांनी लेकरु लेकरु करुन राजकीय ढेकरु देणं बंद करावं, असं म्हणत भाजपचे आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी मनोज जरांगे पाटलांवर (Manoj Jarange Patil) निशाणा साधला. छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आणि मनोज जरांगे यांच्यातील शाब्दिक वाद अख्या महाराष्ट्राने पाहिला. पण आता जरांगे पाटलांनी त्यांचा मोर्चा फडणवीसांकडे (Devendra Fadanvis) वळवलाय.  फडणवीसांनी विधीमंडळात अंतरवाली सराटीतील लाठीचार्ज प्रकऱणी लेखी उत्तर दिलं आणि याच उत्तरामुळे जरांगेंनी फडणवीसांवर निषाणा साधला. 


प्रसाद लाड यांनी काय म्हटलं?


त्यांच्या चालवित्या धनीमुळेच त्यांचं आरक्षण गेलं. छगन भुजबळ ओबीसी भूमिका मांडत आहेत. राजकीय भूमिकेतून जरांगे आता महाराष्ट्राचे दौरे करत आहेत.  त्यांच्याशिवाय कोणीच नाही हे दाखवण्याचा प्रयत्न करतायत.माझ्याकडे एक व्हिडिओ आहे. ज्यामध्ये त्याने  छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोक्यावर पगडी घातली आहे. आता हे शिवाजी महाराज यांच्यापेक्षा मोठे झाले का? असा सवाल प्रसाद लाड यांनी यावेळी उपस्थित केला. जरांगे हे अस्तित्वाची लढाई लढतायत, त्यामुळे ते फडणवीसांवर टीका करतायत.  एकीकडे लेकरु आहे सांगायचं आणि दुसरीकडे दगडी मारायची, बंदूक ठेवायला लावयाची, अशी टीका प्रसाद लाड यांनी केलीये. 


फडणवीसांनी लेखी उत्तरात काय म्हटलं?


अंतरवाली सराटीतील लाठीचार्ज प्रकऱणी फडणवीसांनी विधीमंडळात लेखी उत्तर सादर केलं. यात त्यांनी म्हटलं की, अंतरवाली सराटीत पोलिसांनी बचावात्मक पद्धतीने वाजवी बळाचा वापर केला गेला. जमावाकडून झालेल्या दगडफेकीत 79 पोलीस आणि पोलिसांनी केलेल्या लाठीमारात 50 आंदोलक जखमी झालेत. लाठीचार्जप्रकरणी 3 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. अंतरवाली सराटीतल्या आंदोलकांवरचे गुन्हे तपासणी करुनच मागे घेण्यात येतील. 


दरम्यान अंतरवाली सराटीमध्ये लाठीचार्ज प्रकरणी मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी जरांगे पाटलांकडून करण्यात येते. त्यासाठी त्यांनी सरकारला अल्टिमेटम देखील दिलंय. जर ते गुन्हे सरकारने मागे घेतले नाही, तर 17 डिसेंबर रोजी मराठा समाजाची बैठक घेणार असल्याचं जरांगे पाटलांनी म्हटलंय. त्यामुळे आता हा वाद कोणत्या टोकाला जाणार हे येणाऱ्या काळातच स्पष्ट होईल. 



हेही वाचा :


सरकारला मोजत नाही, गिणत सुद्धा नाही अन् मरायलाही भीत नाही; मनोज जरांगे थेटच बोलले