मुंबई : दुकानं आणि आस्थापनांवर मोठ्या अक्षरात मराठी नामफलकांच्या पूर्ततेसाठी मान्सून नंतरची मुदतवाढ द्या, अशी मागणी मुंबईतील व्यापारी संघटनांची पुन्हा एकदा केली आहे. मुंबई महानगरातील दुकाने आणि आस्थापनांना मराठी नामफलकांच्या पूर्ततेसाठी 30 जूनपर्यंत मुदतवाढ दिली होती. मात्र व्यापारी संघटनांनी ही मुदतवाढ आणखी वाढवून मान्सूननंतर तीन महिन्यांची वेळ या पूर्ततेसाठी द्यावी, अशी विनंती केली आहे.


फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेल्फेअर असोसिएशनकडून उद्योग मंत्री सुभाष देसाई यांना पत्र लिहिण्यात आलं आहे. मुंबई महापालिका क्षेत्रात पाच लाख दुकान आणि आस्थापना आहेत. त्यामुळे या दुकानांवर मराठी नामफलक मोठ्या अक्षरात करण्यासाठी रि-डिझाईन करण्यासाठी फंड, पैसा दुकान मालकांकडे असणं आवश्यक आहे. शिवाय, रि-डिझाईनचे काम मान्सून जवळ येत असताना पूर्ण करणं अवघड आहे. त्यामुळे मान्सूननंतर तीन महिन्याचा कालावधी मराठी नामफलक मोठ्या अक्षरात करण्यासाठी मिळावा, अशी विनंती पत्राद्वारे केली आहे.


याआधी सुद्धा दोन वेळा मोठ्या अक्षरात मराठी नामफलकाच्या पूर्ततेसाठी व्यापारी संघटनांच्या विनंतीद्वारे मुदतही वाढवून दिली होती. त्यामुळे पुन्हा एकदा ही मुदतवाढ दुकान मालकांना दिली जाणार की कारवाई होणार हे बघावं लागेल.


मराठी पाट्या लावण्यासाठी 30 जूनपर्यंत मुदतवाढ
मुंबईत दुकानं आणि आस्थापनांवर मराठी पाट्या लावण्याबाबत महापालिकेकडून मुदतवाढ देण्यात आली आहे. 30 जूनपर्यंत मराठी पाट्या लावण्याच्या सूचना महापालिकेने दिल्या आहेत. आधी ही मुदत 31 मेपर्यंत ठेवण्यात आली होती. 31 मे रोजी मुंबई महापालिकेने सर्वेक्षणालाही सुरुवात केली होती. आता ही मुदत एक महिन्याने वाढवली आहे. 30 जूनपर्यंत दुकानदारांनी दुकानदारांनी पाट्या मराठीत कराव्यात. मराठी नाव मोठ्या अक्षरात असावं, असा नियम आहे.


काय आहेत आदेश?
संबंधित दुकानदार वा आस्थापनेचा प्रमुख आपला नामफलक मराठी देवनागरी लिपीबरोबरच आणखी इतर भाषेतही लिहू शकतो. तथापि मराठी भाषेतील नामफलकावरील अक्षराचा आकार इतर भाषेतील अक्षरांच्या आकारापेक्षा लहान असू नये, असे शासनाच्या राजपत्रात नमूद केलेलं आहे. तसंच ज्या आस्थापनात कोणत्याही प्रकारे मद्यविक्री किंवा मद्यपान सेवा दिली जात असेल, अशा आस्थापनास महापुरुष/महनीय महिला यांची किंवा गडकिल्ल्यांची नावे देण्यात येऊ नये. या नियमाचे उल्‍लंघन केल्यास संबंधित दुकाने व आस्थापना मालकांवर महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन)अधिनियम २०१७ च्या तरतुदीनुसार न्यायालयीन कारवाई करण्यात येईल. याबाबतचा शासन निर्णय 17 मार्च 2022 रोजी जारी करण्यात आला होता.  


संबंधित बातम्या


BMC : मुंबईत ज्या दुकानांच्या पाट्या मराठीत नाहीत त्यांना पुढील आठवड्यापासून दणका, बीएमसी प्रशासन धडक कारवाई करणार


दुकानाच्या पाट्या मराठीत लावा अन्यथा कारवाई, कल्याण डोंबिवली महापालिकेचा इशारा


Marathi Nameplate : नाशिकमधील 80 टक्के दुकानांवर इंग्रजी पाट्या, दुकानदारांचा निर्णयाला 'खो' 


 


बारावी बोर्डाचा निकाल; एबीपी माझावर पाहता येणार, कसा पाहाल? 


यंदा तुम्हाला 'ABP Majha'च्या वेबसाईटवर तुमचा निकाल पाहता येणार आहे. एबीपी माझाची अधिकृत वेबसाईट marathi.abplive.com वर बारावीचे विद्यार्थी झटपट आपला निकाल पाहू शकणार आहेत. एबीपी माझाच्या वेबसाईटवर निकाल पाहण्यासाठी mh12.abpmajha.com या लिंकवर क्लिक करा.