मुंबई : पवई येथील हिरानंदानी परिसरातील एका हॉटेलवर पोलिसांनी छापा (Police raid) टाकून वेश्या व्यवसायात सहभागी असलेल्या 4 नवोदित अभिनेत्रींची सुटका केली आहे. तरुणींना वेश्या व्यवसायात ढकलणाऱ्या श्याम सुंदर अरोरा (Shyam Sundar Arora)  या 60  वर्षीय दलालाला देखील पोलिसांनी अटक केली आहे. या चारही तरुणींना देवनार येथील महिला सुधारगृहात पाठवण्यात आले आहे.


चारही तरुणी टीव्ही मालिकांमध्ये काम करणाऱ्या 


पवई येथे देहव्यापार करणारी टोळी कार्यरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर तोतया ग्राहकांद्वारे पोलिसांनी सापळा रचून पर्दाफाश केला होता. चारही तरुणी टीव्ही मालिकांमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्री व मॉडेलिंग करणाऱ्या आहेत. पोलिसांनी त्यांच्या तावडीतून चार तरुणींची सुटका केली आहे. त्या तरुणी 26 ते 35 वर्ष वयोगटातील आहेत. पोलिसांनी या कारवाई दरम्यान हॉटेलच्या खोल्यांमधून 8 महागडे मोबाईल, रोख रक्कम जप्त केली आहे. चार महिलांच्या चौकशीत अरोरा ग्राहकांकडून मिळणाऱ्या पैशांपैकी 50 टक्के रक्कम स्वतः घेत असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. या प्रकरणी पवई पोलिस अधिक तपास करत आहेत.


राज्यातील काही ठिकाणी हॉटेलच्या नावाखाली वेश्याव्यवसाय


दरम्यान राज्यातील काही ठिकाणी हॉटेलच्या नावाखाली वेश्याव्यवसाय चालत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. अशा ठिकाणी पोलिस कारवाई करत पर्दाफाश करत आहेत. पोलिस सेक्स रॅकेट चालवणाऱ्यांविरोधात थेट कारवाई करत आहेत. अनेक हायप्रोफाइल प्रकरणे उघडकीस आणली आहेत. दरम्यान, राज्यातील काही भागात मसाज पार्लर स्पाच्या नावाने देखील वेश्या व्यवसाय चालवल्याचे उघड झाले आहे. यावर देखील पोलिसांकडून करडी नजर ठेवली जाणार असून नागरिकांना असं काही आढळल्यास थेट तक्रारी कराव्यात, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. 


महत्वाच्या बातम्या:


Akola Crime News: घरगुती खानावळच्या नावाखाली नको ते कृत्य; स्थानिकांनी महिलांसह पुरुषांना घरात कोंडलं, अन् पुढे....