मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना आज चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश अंमलबजावणी संचालनालयाने दिले होते. परंतु वर्षा राऊत आज चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर राहणार नाहीत. वर्षा राऊत यांनी सोमवारी (28 डिसेंबर) संध्याकाळी ईडीला पत्र लिहून चौकशीला हजर राहण्यासाठी मुदत वाढ देण्याची मागणी केली आहे. सूत्रांनी याबाबतची माहिती दिली आहे.
वर्षा राऊत आता 5 जानेवारीला चौकशीसाठी हजर राहतील अशी शक्यता आहे. ईडीने वर्षा राऊत यांना 29 डिसेंबर म्हणजेच आज चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते. परंतु वकिलांशी सल्लामसलत करण्यासाठी त्यांनी 5 जानेवारीपर्यंत मुदतवाढ मागितल्याचं कळतं. दरम्यान ईडीने वर्षा राऊत यांच्या पत्राला अद्याप कोणतंही उत्तर दिलेलं नाही.
55 लाख रुपयांच्या व्यवहाराप्रकरणी ईडीला वर्षा राऊत यांची चौकशी करायची आहे, ज्यात वर्षा राऊत यांनी पीएमसी बँक खात्यामधून आर्थिक व्यवहार झाले होते. ईडीने त्यांना नोटीस पाठवून 29 डिसेंबर रोजी चौकशीसाठी कार्यालयात हजर होण्याने निर्देश दिले होते.
संजय राऊत यांचं ट्वीट
पत्नीला ईडीची नोटीस मिळाल्यानंरत संजय राऊत यांनी ट्वीट केलं. होतं. कोणाचंही नाव न घेता त्यांनी लिहिलं होतं की, "आ देखें जरा किसमें कितना है दम, जमकर रखना कदम मेरे साथिया"
पीएमसी बँक घोटाळा काय आहे?
पीएमसी बँकेत बनावट खात्यांद्वारे एका विकासकाला शेकडो कोटी रुपये कर्ज दिल्याची बाब 2019 मध्ये रिझर्व्ह बँकेच्या निदर्शनास आली होती. ही प्रक्रिया पूर्ण होऊ नये यासाठी आरबीआयने सप्टेंबर 2019 मध्ये निर्बंध घातले होते.
हे निर्बंध मार्च 2021 पर्यंत वाढवण्यात आले आहेत. पीएमसी बँक घोटाळ्यात आर्थिक गुन्हे शाखेने सारंग वाधवान आणि राकेश वाधवान यांना अटक केली होती. पीएमसी बँकला बुडवण्यात जी 44 मुख्य खाती होती, त्यापैकी 10 खाती एचडीआयएलची होती.
संबंधित बातम्या
- राजकीय भडास काढण्यासाठी ईडी, सीबीआयचा वापर : संजय राऊत
- ED Notice to Varsha Raut | वर्षा राऊत यांना ईडी नोटीसनंतर संजय राऊतांचं ट्वीटद्वारे आव्हान, म्हणाले...
- शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीची नोटीस
Varsha Raut | वर्षा राऊत आज ईडी चौकशीसाठी हजर राहणार नाहीत : संजय राऊत