Balasaheb Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती आहे. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीनिमित्त अभिवादन केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केले आहे.  "बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. सदैव जनतेच्या पाठीशी उभा राहणारा उत्कृष्ट नेता म्हणून ते कायम स्मरणात राहतील." असे ट्विट नरेंद्र मोदी यांनी केले आहे.  




दरम्यान, बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आणि दैनिक सामनाच्या वर्धापनदिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज शिवसैनिकांशी संवाद साधणार आहेत. प्रकृतीच्या कारणामुळे उद्धव ठाकरे शिवसैनिकांसोबत ऑनलाईन संवाद साधणार आहेत. कोरोनामुळे दोन वर्षांपासून उद्धव ठाकरे यांना शिवसैनिकांसोबत संवाद साधता आला नाही. त्यामुळे आज रात्री आठ वाजता हा ऑनलाईन संवाद असेल, अशी माहिती शिवसेना खासदार अनिल देसाई यांनी दिली. 


"मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची तब्येत उत्तम आहे. विरोधकांना त्यांच्या तब्येतीची अधिक चिंता वाटत आहे, त्याविषयी ते नेहमी बोलत असतात. विरोधी नेत्यांच्या बिघडलेल्या प्रकृतीची ही लक्षणं आहेत अशी टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली. याबरोबरच आज संध्याकाळी उद्धव ठाकरे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधतील. शिवसेनेच्या राजकारणाची पुढची दिशा देखील आजच्या संवादातून उद्धव ठाकरे देतील आणि आपली भूमिका मांडतील, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली. 


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून सुभाषचंद्र बोस, बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सकाळी नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीनिमित्त अभिवादन केले. यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेही उस्थित होते. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी हा छोटासा कार्यक्रम पार पडला. 


महत्वाच्या बातम्या